जि.प. सदस्यांच्या पतीला समज देण्याचे आदेश

0

जळगाव । जिल्हा परिषद कर्मचारी व अधिकार्‍यांना शिवीगाळ करणार्‍या चंद्रशेखर अत्तरदे यांना नोटीस बजावून जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बोलावून समज द्यावी, असे आदेश पालकमंत्री ना.चंद्रकांत पाटील यांनी दिले.

जिल्हा परिषदेच्या सदस्या माधुरी अत्तरदे यांचे पती चंद्रशेखर अत्तरदे यांनी बांधकाम विभागात येवून अधिकारी व कर्मचार्‍यांना शिवीगाळ व दमदाटीच्या केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या कर्मचार्‍यांनी आज पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांची भेट घेवून निवेदन दिले.

त्यावर पालकमंत्री ना.चंद्रकांत पाटील यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेवून याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक व जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अत्तरदे यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले.

LEAVE A REPLY

*