शिवीगाळप्रकरणी जि.प. कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन

0

जळगाव । जिल्हा परिषदेच्या सदस्या माधुरी अत्तरदे यांचे पती चंद्रशेखर अत्तरदे यांनी बांधकाम विभागात येवून अधिकारी व कर्मचार्‍यांना केलेल्या शिवीगाळ व दमदाटीच्या निषेधार्थ जिल्हा परिषदेच्या कर्मचार्‍यांनी इमारतीच्या प्रांगणात आज सकाळपासून कामबंद आंदोलन केले. दरम्यान याप्रकराबाबत कर्मचार्‍यांनी पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांची भेट घेवून निवेदन दिले.

बांधकाम विभागात येवून चंद्रशेखर अत्तरदे यांनी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप कापडणीस व कर्मचारी चंद्रभान पाटील यांना शिवीगाळ करून त्यांच्या टेबलवरील शासकीय फाईलींची फेकाफेक करून फोनवरून शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली होती.

याप्रकाराच्या निषेधार्थ जि.प. कर्मचार्‍यांनी एकजूट दाखवून सीईओ यांना निवेदन देत लेखणीबंद आंदोलन पुकारले होते. आज सकाळपासून सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी कामबंद आंदोलन करून इमारतीच्या प्रांगणात ठिय्या मांडला होता.

LEAVE A REPLY

*