अजिंठा चौफुलीवर अपघात मोटारसायकलस्वारांना उडविले

0

जळगाव । शहरातील अंजिठा चौफुली चौकात भरधाव ट्रकने ट्रीपल सिटस्वार मोटारसायकलस्वारांना उडविल्याची घटना सकाळी 6.40 वाजेच्या सुमारास घडली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोघे जण गंभीर जखमी झाले आहे.

मयत भुसावळ येथील रहिवाशी असून पोलिसांनी ट्रकसह चालकास ताब्यात घेतले आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

याबाबत पोलिसांकडून व नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, भुसावळ येथील स्टीलचे भांडे विक्रीचा व्यवसाय करणारे श्रीनिवास शक्तीनारायण रेड्डी वय 40, अनिल अंजलैय्या एटकल्ली वय 32, आदि सुरेय्या रेड्डी वय 35तिघे मुळ रा. विजयवाडा आन्धप्रदेश हे मित्राच्या लग्नासाठी भुसावळ येथून जळगावकडे मोटारसायकल क्रमांक एमएच 19 सीएम 1293 ने येत असतांना अंजिठा चौफुली चौकात औरंगाबादकडून भुसावळकडे जाणारा जीजे 03 बीटी 9335 क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या धडकेत मोटारसायकलवरील तिघे जण खाली पडल्याने यात श्रीनिवास शक्तीनारायण रेड्डी यांचा जागीच मृत्यू झाला. तर अनिल अंजलैय्या एटकल्ली व आदि सुरेय्या रेड्डी हे दोघे गंभीर जखमी झाले.

नागरिकांच्या मदतीने जखमी दोघांना तात्काळ उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान घटनेची माहिती कळताच सपोनि समाधान पाटील, पोहेकॉ. भरत लिंगायत यांनी जिल्हा रुग्णालयात येवून जखमींचे जबाब नोंदविले. याप्रकरणी पोलिसांनी ट्रकसह चालकास ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

अपघातामुळे चौकात वाहतुक विस्कळीत
अंजिठा चौफुली चौकात अपघात झाल्याने काही वेळ वाहतुक ठप्प झाली होती. घटनेची माहिती कळताच एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून वाहतूक सुरळीत केली.

दोघांची प्रकृती चिंताजनक
अपघात होताच तिघांना तात्काळ रक्तबंबाळ अवस्थेत उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणीअंती श्रीनिवास सक्तीनारायण रेड्डी यांना मयत घोषित केले. अनिल एटकल्ली व आदि सुरैय्या हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे.

मयत श्रीनिवास रेड्डी भुसावळ येथील रहिवाशी
मयत श्रीनिवास रेड्डी हे मुळ आन्धप्रदेशमधील विजयवाडा येथील रहिवाशी असून गेल्या 7-8 वर्षापासून ते व्यवसायानिमित्त भुसावळ येथे वास्तवास आहे. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली असा परिवार आहे. घटनेची माहिती कळताच कुटुंबियांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती.

LEAVE A REPLY

*