अतिक्रमण निर्मुलन कारवाईत नऊ हातगाड्या जप्त

0

जळगाव । मनपा प्रशासनाच्या अतिक्रमण विभागातर्फे शहरात गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमण निर्मुलनाची मोहिम सुरु आहे. आज महात्मा गांधी उद्यान आणि ख्वॉजामिया चौकातून 9 हातगाड्यासह काही किरकोळ साहित्य जप्त करण्यात आले आहे. तसेच भाजीपाला जप्त करुन रिमांडहोम येथे दिले आहे.

शहरातील नो हॉकर्सझोनमधील हॉकर्सधारकांवर कारवाईची मोहिम प्रशासनाने सुरु केली आहे. आज सकाळी महात्मा गांधी उद्यान आणि ख्यॉजामिया चौकातून 9 हातगाड्या 2 टबेल, 2 सिलेंडर तसेच भाजीपाला देखील जप्त करण्यात आला आहे.

जप्त केलेला भाजीपाला रिमांड होम येथे दिला आहे. ही कारवाई अतिक्रमण अधिक्षक एच.एम.खान, आतिष राणा, साजिद अली, वैभव धर्माधिकारी, विजय देशमुख, हरीष सोनवणे, सतिष ठाकरे यांच्या पथकाने केली.

लोकशाहीदिनी नगररचनाच्या सर्वाधिक नऊ तक्रारी
मनपात लोकशाहीदिनी 14 तक्रारी प्राप्त झाले असून सर्वाधिक 9 तक्रारी नगररचना विभागाच्या आहेत. तसेच किरकोळ वसुली विभाग 1, पर्यावरण 1, विधी शाखा 1 आणि आरोग्य विभागाच्या 2 तक्रारी प्राप्त झाल्या. दरम्यान प्राप्त झालेल्या तक्रारी संबंधित विभागांकडे कार्यवाहीसाठी वर्ग करण्यात आल्या. लोकशाहीदिनाला अप्पर आयुक्त राजेश कानडे, उपायुक्त चंद्रकांत खोसे, सहाय्यक उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*