जि.प.अध्यक्षांवर अपात्रतेची कारवाई करा – जि.प. सदस्याची नोटीसीद्वारे सीईओंकडे मागणी

0
जळगाव |  प्रतिनिधी :  जि.प. अध्यक्षा यांनी खातेवाटप करतांना महिला बालकल्याण समिती सभापती यांच्याकडे बांधकाम समितीचा पदभार दिला आहे.

अध्यक्षांनी जि.प.व पं.स. अधिनियम १९६१ चे उल्लंघन केले असून बेकायदेशीररित्या विषय समित्यांचे खाते वाटप केले आहे. त्यामुळे सात दिवसाच्या आत अध्यक्षांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जि.प. सदस्य जयपाल बोदडे यांनी सीईओंना दिलेल्या नोटीसीत केली आहे.

भाजपाचे जि.प. सदस्य जयपाल बोदडे यांनी सीईओ यांना वकीलामार्फत नोटीस दिली आहे. अध्यक्षांनी जि.प. व पं.स. अधिनियमांचे उल्लंघन करुन एकाच सदस्याकडे दोन समितीचा पदभार दिलेला आहे.

याबाबतच्या अंतीम इतिवृत्तावर सदस्य सचिवांनी अभिप्राय नोंदवून खातेवाटपाच्या ठरावात दुरुस्ती करावी, असे सूचविले होते.

अध्यक्षांनी बेकायदेशीर पध्दतीने कायद्यातील तरतुदींचा भंग केल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, अशा आशयाची नोटीस जयपाल बोदडे यांनी सीईओ यांना दिली आहे.

अध्यक्षांवर अपात्रतेच्या कारवाई संबंधीची नोटीस सीईओ यांना वकिलामार्फत रजिस्टर स्पीडपोस्टद्वारे पाठविण्यात आली आहे.
– जयपाल बोदडे,
जि.प. सदस्य

LEAVE A REPLY

*