प्रदर्शनात बाल संशोधकांनी साकारली विविध उपकरणे

0

जळगाव । तालुक्यातील असोदा येथे पंचायत समिती व शिक्षण विभागातर्फे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले हाते. या विज्ञान प्रदर्शनात बाल संशोधकांनी पाणी बचत, वीजनिमिर्ती, पर्यावरण संरक्षणासह विविध उपकरणे सादर केली. या प्रदर्शनात 24 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

असोदा येथे घेण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन पंचायत समिती सभापत यमुनाबाई रोटे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जि.प.सदस्य प्रताप पाटील, लालचंद पाटील, पवन सोनवणे, पल्लवी पाटील, प.स.उपसभापती शितल पाटील, सदस्या ज्योती महाजन, जागृती चौधरी, नंदलाल पाटील, उपशिक्षणाधिकारी डॉ. देवांग, विस्तार अधिकारी बळीराम धाडी, संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन, संचालक भास्कर महाजन, प्रकाश कोल्हे, एकनाथ महाजन, प्रभारी मुख्याध्यापक आर.एम.पाटील, पर्यवेक्षिका विद्या खाचणे उपस्थित होते.

सुरवातीला गटशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी विज्ञान प्रदर्शनामागील भुमिका उद्देश स्पष्ट केला. विद्यार्थांनी आपल्यात संशोधनात्मक वृत्ती वाढुन नवनवीन संशोधनास चालना द्यावी.

यासारख्या प्रर्दशनातुनच विद्यार्थांना संशोधनाची आवड निर्माण होत असल्याचे सभापती यमुनाबाई रोटे सांगितले. संस्थाध्यक्ष अनिल महाजन यांनीही विद्यार्थांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी संस्थात्मक पातळीवर प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले. सुत्रसंचालन भारती पाटील यांनी तर आभार विज्ञान शिक्षक गोपाळ महाजन यांनी मानले.

LEAVE A REPLY

*