रॅलीद्वारे अपंग बांधवांच्या प्रतिबंध उपाययोजनाबाबत जनजागृती

0

जळगाव । आंतरराष्ट्रीय अपंग दिनानिमित्त शहरातून काढण्यात आलेल्या जनप्रबोधन रॅलीद्वारे अपंग बांधवांच्या प्रतिबंध उपाय योजनांबाबत जनजागृती करण्यात करण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागांतर्गत शासकीय अपंग संमिश्र केंद, उत्कर्ष मतिमंद विद्यालय, मुकबधीर विद्यालय, श्रवण विकास मंदिर सावखेडा, अंध औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, प्रौढ मतिमंद मुलांची कार्यशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने जनप्रबोधन रॅली काढण्यात आली.

जि.प.समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून जी.एस.गाऊंडपासून या रॅलीला सुरवात झाली. यावेळी मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंद गोसावी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी डॉ.अनिता राठोड, अपंग विभाग वैसाका श्रीमती एस.एस.भागवत,तसेच शहरातील दिव्यांगाच्या शाळेतील दिव्यांग विद्यार्थी व शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रॅलीला जी.एस.ग्राउंड पासून सुरु होऊन,कोर्ट चौक, नेहरू चौक, सरस्वती डेअरी मार्गे नवीपेठेतील मुकबधीर विद्यालय नवी या ठिकाणी रॅलीची सांगता झाली.

शासकीय अपंग संमिश्र केंद्राचे अधिक्षक घाटे ,उत्कर्ष मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय बोरसे , मुकबधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक एकनाथ पवार, श्रवण विकास मंदिर सावखेडाचे मुख्याध्यापक पद्माकर इंगळे ,अंध औद्योगिक प्रशिक्षण केंद्रच्या निर्देशिका सौ. महाजन व सर्व शाळेतील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

*