14 लाभार्थ्यांनी केले अनुदान परत ; गुन्हा दाखल होताच 42 लाभार्थ्यांकडून शौचालय बांधकामाला सुरुवात

0

जळगाव । स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय बांधकामासाठी पात्र लाभार्थ्यांना पहिल्या टप्यात अनुदान वितरीत करण्यात आले होते.

परंतु अद्यापही शौचालयाचे बांधकाम सुरु न करणार्‍या 92 लाभार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे भितीपोटी 14 लाभार्थ्यांनी महानगरपालिकेला अनुदान परत केले.

तर 42 लाभार्थ्यांनी शौचालय बांधकामाला सुरुवात केली असल्याची माहिती आरोग्य अधिकारी उदय पाटील यांनी दिली.
शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी स्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

या योजनेंतर्गत शौचालय बांधकामासाठी शासनातर्फे 12 हजार आणि महानगरपालिकेतर्फे 5 हजार असे 6 हजार रुपयाचे अनुदान देण्यात आले आहे.

आतापर्यंत 4 हजार 906 लाभार्थ्यांना अनुदान दिले आहे. मात्र काहींनी अद्यापही बांधकाम सुरु न केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

वारंवार सूचना आणि नोटीस बजावून देखील लाभार्थ्यांनी शौचालयाचे बांधकाम सुरु केले नाही. त्यामुळे प्रशासनाने 92 लाभार्थ्यांविरुद्ध शहर पोलीसांत गुन्हा दाखल केला आहे.

या भितीपोटी 42 लाभार्थ्यांनी बांधकामाला सुरुवात केली असून 14 लाभार्थ्यांनी अनुदान परत केले असल्याची माहिती आरोग्य अधिकारी उदय पाटील यांनी दिली.

LEAVE A REPLY

*