मेडीकल हबसाठी 1500 कोटींचा आराखडा – ना.गिरीश महाजन

0

जळगाव ।जिल्ह्यात आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासनाने मेडिकल हब सुरु करण्यासाठी मंजूरी दिली असून त्यासाठी चिंचोली शिवारात सुमारे 100 एकर जागा घेण्यात आली आहे. यासाठी शासनाने 1 हजार 500 कोटी रुपयाचा आराखडा मंजूर केला असल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामीण महाआरोग्य शिबिरातंर्गत मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र अभियानाची मुहूर्तमेढ जळगाव येथून रोवली गेली आहे. या शिबिराचा समारोप येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर आ.स्मिता वाघ, महापौर ललीत कोल्हे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, नेत्र शल्य चिकित्सक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिणी पारेख, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर, रामेश्वर नाईक उपस्थित होते.

यावेळी शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या रुग्णांना हस्ते चष्मे वाटप करण्यात आले. दरम्यान पुढे बोलतांना ना. महाजन म्हणाले की, ज्या रुग्णांची आर्थिक क्षमता नाही अशा रुग्णांवर सर्व प्रकारचे उपचार मोफत करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. राज्यात मोतीबिंदूचे 17 लाखापेक्षा अधिक रुग्ण आहे. दरवर्षी 7 लाख रुग्णांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया अगदी मोफत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

सुत्रसंचलन पिंताबर भावसार यांनी केले. तर आभार मुरली पाटील यांनी मानले. शिबीरात आलेल्या रुग्ण तसेच त्यांचे नातेवाईक यांची जेवण व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जैन एरिगेशन यांच्यावतीने करण्यात आली होती. त्याचबरोबर एल. के. फाउंडेशन, जी. एम. फाउंडेशन यांच्यासह विविध सामाजिक संस्थाचे सहकार्य लाभले.

10 दिवसात 1 हजार 317 रुग्णांवर शस्त्रक्रिया
मोतीबींदू मुक्त अभियानात 10 दिवसात एकूण 1 हजाी 317 रुग्णांवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यामध्ये 1 हजार 286 रुग्णांवर मोतीबिंदूचे तर 31 रुग्णांवर पडद्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*