थकबाकी न भरल्यास खुल्या भूखंडाचा लिलाव

0

जळगाव । शहरात साफसफाई अभावी काही दिवसापुर्वी साथीच्या रोगांचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे मनपा प्रळासनाकडुन शहरातील खुल्या भुखंडांची स्वच्छता करण्यात आली असून ज्या भुखंडाची स्वच्छता केली, त्या भुखंडधारकांकडून शुल्क आकरणी करण्याचाा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसेच ज्यांच्यांकडे थकबाकी आहे. त्या भुखंडाचा लिलाव करण्यात येणार आहे.त्याद़ृष्टीने प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे.

शहरात सुमारे 28 हजार खुले भुखंड आहेत. या भुखंडामध्ये साफसफाई केली जात नसल्याने मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. गेल्या दोन- तिन महिन्यात शहरात साथ रोगाचा फैलाव वाढला होता.

त्यामुळे प्रशासनाने या भुखंडाची स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला होता.त्यानुसार प्रशासनाने शहरातील भुखंडाची स्वच्छता केली.खाजगी खुले स्वच्छ केल्यामुळे संबधित भुखंड मालकांकडुन स्क्वेअर फुटाप्रमाणे स्वच्छतेचा खर्च वसुल करण्याच्या सूचना अप्पर आयुक्त राजेश कानडे यांनी आरोग्य अधिकारी उदय पाटील यांना दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

*