शिवसेनेची वैद्यकीय आघाडी स्थापन

0

जळगाव । जिल्हाभरातून दररोज हजारोच्या संख्येने रुग्ण उपचार घेण्यासाठी शहरात येत असतात. परंतू त्यांची हेळसांड रोखण्यासाठी व त्यांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी शिवसेनेतर्फे वैद्यकीय आघाडी स्थापन करण्यात आली असून आघाडीच्या महानगरप्रमुखपदी डॉ. खुशाल जावळे तर उपमहानगरप्रमुखपदी डॉ. योगीता शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेना पक्ष प्रमुख यांच्या आदेशानुसार माजी आ. सुरेशदादा जैन यांच्या उपस्थितीत शहरात शिवसेना वैद्यकीय आघाडी स्थापन करण्यात आली.

दरम्यान माजी आ. सुरेशदादा जैन यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देवून आघाडीच्या महानगरप्रमुखपदी डॉ. खुशाल जावळे, महानगर संघटकपदी डॉ. सतिष भदणे, महानगर उपमहानगरप्रमुखपदी डॉ. योगिता शिंदे व डॉ. अजय कोकणे यांची तर सदस्यपदी डॉ. शैलेश जाधव, डॉ. विशाल शिंदे, डॉ. भरत माळी, डॉ. प्रदिप शिंदे, डॉ. विकास पाटील, डॉ. गिरीष रडे, डॉ. संतोष पाटील, डॉ. देवदत्त पाटील, डॉ. अतुल पाटील, डॉ. अतुल सोनवणे, डॉ. सोनाली बागुल यांची निवड करण्यात आली आहे.

याप्रसंगी महानगरप्रमुख शरद तायडे, माजी महापौर नितीन लढ्ढा, शहर संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, किशोर भोसले, गणेश सोनवणे, मानसिंग सोनवणे, जब्बार पटेल आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*