राज्यस्तरीय बालविज्ञान परिषदेत बालसंशोधकांचा अविष्कार

0

जळगाव । गोदावरी सीबीएसई शाळेत 25 व्या राज्यस्तरीय राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत राज्यभरातील 80 शाळांतील बालवैज्ञानिकांनी पर्यावरणपुरक, सामाजिक, मानवी आरोग्य यासह विविध विषयांवर संशोधनात्मक आविष्कार सादर केले.

यामध्ये माती विहरीत शेती, शेतातील टाकाऊ पदार्थांपासून कोळसा व व्हीनेगारची निर्मीती विद्यार्थ्यांनी केली होती. हे प्रकल्प बघण्यासाठी विद्यार्थ्यांसह शिक्षक व पालकांनी भेट देवून विद्यार्थ्याचे कौतूक केले.

गोदावरी सीबीएसई इंग्लिश मिडीअम स्कुलमध्ये दि. 1 रोजी पासून 25 व्या राज्यस्तरीय राष्ट्रीय बालविज्ञान परीषद सुरु आहे. या परीषदेत राज्यातील 80 शाळानी सहभाग घेतला असुन त्यांनी विविध विषयांवर संशोधनात्मक प्रकल्प सादर केले आहेत.

आज या परीषदेत सादर झालेले प्रकल्प हे सर्वांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले होते. अहमदाबाद येथे होणार्‍या राष्ट्रीय परीषदेसाठी या परीषदेतुन प्रकल्पांची निवड केली जाणार आहे.

विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पक बुध्दीच्या जोरावर सादर केलेले संशोधनात्मक आविष्कार हे भविष्यासाठी निश्चीतपणे उपयोगी ठरणार असल्याच्या प्रतिक्रिया पालक आणि शिक्षकांनी व्यक्त केल्या. परीषदेसाठी प्राचार्या निलीमा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक लिना चौधरी, खलील खान, नदीम शेख, प्रिया चौधरी यांच्यासह शिक्षक, शिक्षीका व कर्मचारी परीश्रम घेत आहे.

खारघरच्या विद्यार्थ्यांनी साकारले भुकंपामुळे होणारे नुकसान कमी करणारे तंत्रज्ञानखारघर येथील डीएव्ही इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी भुंकपापासुन होणारे नुकसान कमी कसे करता येईल याचे आधुनिक तंत्रज्ञानाचा शोध लावला आहे. ट्युन मास डॅम्पर, ट्युन लिक्वीड डॅम्पर आणि ट्युन लिक्वीड कॉलम डॅम्पर यांचा वापर करून भुकंप झाल्यानंतर इमारतीत निर्माण होणारी उर्जा कमी करून नुकसान कमी करण्याचा प्रयत्न या आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे शक्य होणार आहे. प्रिती सामा व संगीता निंगुले यांच्या मार्गदर्शनाखाली आदित्य नेवास्कर आणि अक्षद शर्मा या विद्यार्थ्यांनी हे तंत्रज्ञान विकसीत केले आहे.

LEAVE A REPLY

*