पोलीस निरीक्षकाच्या पत्नीची राहत्या घरात हत्या

0
मुंबई / पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गनोरे यांच्या पत्नीची हत्या झाली आहे. त्यांच्या हत्येमागे त्यांचा मुलगा सिद्धार्थ असल्याचा अंदाज वर्तवत असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पोलीस घटनास्थळी पोहोचले असून वाकोला पोलिसांनी याप्रकरणी अज्ञातव्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ज्ञानेश्वर गनोरे हे खार पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. गनोरे हे आपली पत्नी दिपाली आणि मुलगा सिद्धार्थ यांच्यासोबत सांताक्रुझ येथे राहतात.

मंगळवारी सकाळी गनोरे हे ड्युटीवर गेले होते. त्यावेळी त्यांचे सिद्धार्थ आणि पत्नी दीपाली यांच्याशी शेवटचे बोलणे झाले होते.

गनोरे हे बुधवारी सकाळी ड्युटीवरून परत आले, तेव्हा त्यांना घराचे दार बाहेरून बंद दिसले. त्यांनी पत्नीच्या मोबाईलवर संपर्क केला. पण प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला.

तेथे त्यांना पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्यांनी याबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. या घटनेनंतर सिद्धार्थ बेपत्ता असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

सिद्धार्थ आणि त्याची आई दिपाली यांच्यामध्ये पैशावरून वाद झाला होता. यामुळे दिपाली गनोरे यांची हत्या सिद्धार्थने केली असावी, असा अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे.

LEAVE A REPLY

*