प्रवीण महाजनांचा मृत्यू अनैसर्गिक

0

उस्मानाबाद । प्रवीण महाजन यांचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला नसल्याचा खळबळजनक दावा त्यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी आज उस्मानाबाद येथे एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला.

महाजन कुटुंबियांच्या उस्मानाबाद येथील वडिलोपार्जित जमिनीतील हिश्श्यावरुन सारंगी महाजन व महाजन कुटुंबियातील वाद जिल्हा न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे. त्याच्या तारखेसाठी शनिवारी सारंगी महाजन उस्मानाबाद येथे आल्या होत्या.

सारंगी म्हणाल्या, महाजन कुटुंबाची वारसा हक्काने मिळणारी जमीन आपल्याला मिळू नये, यासाठी मला सहा वर्षांपासून चकरा मारायला लावल्या जात आहेत. मला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.

माझ्यावर दडपण आणण्यासाठी न्यायालयाच्या तारखेला समोरून गाडीभरून गुंड आणले जातात. हे काम एक स्वीयसहाय्यक करतो, असा आरोप सारंगी महाजन यांनी केला. पतीचा मृत्यू या सर्व विषयावर पुस्तक लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*