जिल्ह्याचे कामकाज झेपवत नसेल तर पालकमंत्र्यांनी कोल्हापूरकडेच लक्ष द्यावे-ऍड.संदिप पाटील

0
चाळीसगाव | प्रतिनिधी : तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांमुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत सहा मानवी जीवांसह अनेक पाळीव प्राणी बिबट्याने फस्त केले आहेत. बिबट्या मारण्यासाठी उभ्या करण्यात आलेल्या यंत्रणेमध्ये नियोजनाचा अभाव दिसून येत आहे.

आजही ग्रामस्थांना शासकिय यंत्रणा काम करत नसल्यासारखे वाटत आहे. स्थानिक आमदारांसह जिल्ह्याचे पालकमंत्री यांना घटनेचे गांभीर्य दिसत नाही.

सहा मानवी जीव जाऊनही जिल्ह्याचेे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यानी या घटनेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. जर त्यांना घटनेचे गांभीर्यच नसेल तर त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री सोडून कोल्हापूरकडेच लक्ष द्यावे असा सल्ला कॉंगे्रसचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांनी दिला आहे.

नरभक्षक बिबट्याचा हल्ल्यात ठार झालेल्या कुटूंबियांची भेट घेण्यासाठी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदिप पाटील हे वरखेडे येथे आले होते. भेट दिल्यानतंर त्यांनी शहरातील शासकिय विश्रामगृह येथे दुपारी १ वा. पत्रकार परिषद घेतली.

यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा उपाध्यक्ष अशोक खलाणे, सरचिटणीस अजबराव पाटील, तालुकाध्यक्ष अनिल निकम, शहराध्यक्ष देवेंद्रसिंग पाटील, बाळासाहेब पाटील, रमेश शिंपी आदि पदाधिकारी उपस्थित होेते.

लवकरच लोकशाही मार्गाने मोर्चा

पुढे बोलतांना ऍड.पाटील म्हणाले की, घटनास्थळी भेट दिली असता वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी बिबट्या पकडण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आल्याचे दिसले. परंतू बिबट्या पकडण्यासाठी पाहिजे त्यापध्दतीने प्रभावी अमंलबाजवणी केली जात नाही.

ग्रामस्थांचे म्हणणेे जाऊन घेतले असता ड्रोन कॅमेरे हे फक्त २० मिनिटच काम करीत असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच बिबट्याच्या बंदोबस्तासाठी पाहिजे त्यापध्दतीने काम केले जात नाही.

पुढे दोन दिवसात बिबट्याचा बंदोबस्तासाठी प्रभावी यंत्रणा राबविली न गेल्यास आम्ही लोकशाही मार्गाने निर्देशने व आंदोलन करणार असल्याचे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

*