क्रीडासंकुल रखडल्याने अधिवेशनात आवाज उठविणार! – आ.स्मिता वाघ

0
अमळनेर | प्रतिनिधी :   संपूर्ण महाराष्ट्रात तालुका क्रीडा संकुले निधी अभावी रखडलेले आहेत, हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी येत्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला जाईल, असे आश्वासन आमदार स्मिता वाघ यांनी नाट्यगृहात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव अमळनेर क्रीडा परिषदेच्या वतीने आयोजित गुणगौरव सोहळ्यात दिले.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, प्रांताधिकारी संजय गायकवाड, तहसीलदार प्रदीप पाटील, गटशिक्षणाधिकारी अशोक बिर्‍हाडे, बांधकाम सभापती मनोज पाटील, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र पिंगळे, संजय पाटील, प्रताप शिंपी , संदीप घोरपडे, पी. डी. पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी आर. डी. महाजन, संजय भिल, डी. डी. राजपूत, किशोर मोरे उपस्थित होते.

आ. सौ.वाघ पुढे म्हणाल्या, की सुविधा नसतानाही क्रीडा शिक्षक खेळाडू तयार करतात म्हणून तालुक्यातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून जळगाव जिल्ह्यात प्रथमच मोठ्या प्रमाणावर गुणगौरव सोहळा होत आहे. नाट्यगृहसाठीही आमदार वाघ यांनी ५ लाख रुपयांचे अनुदान जाहीर केले.

यावेळी उत्कृष्ट खेळाडू म्हणून अमेय कोळी, मनोज पाटील तर उत्कृष्ट शाळा म्हणून जी एस हायस्कूल, एन टी मुंदडा ग्लोबल विव्ह्यू यांना तर सुनील वाघ, डी डी राजपूत, संजय पाटील, एस वाय करंदीकर या शिक्षकांना उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार देण्यात आला त्याच प्रमाणे राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध खेळांमध्ये प्रावीण्य मिळविलेल्या खेळाडूंचा व सर्व क्रीडा शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी के यू बागुल, महेश माळी, निलेश विसपुते, सचिन वाघ, असिङ्ग टकारी, प्रतीक बाविस्कर, आशुतोष मगरे, सॅम भोई,यांच्यासह तालुक्यतील क्रीडा शिक्षक व विद्यार्थी उपस्थीत होते. क्रीडा शिक्षक एस. पी. वाघ यांनी प्रास्ताविक केले. वसुंधरा लांडगे यांनी सूत्रसंचालन तर आभार संजय पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

*