अमेरीकेतून भारताला होतोय अस्वच्छ इंधन पुरवठा

0
नवी दिल्ली : अमेरीकेतून भारताला होत असलेला इंधन पुरवठा हा अस्वच्छ होत आहे. पेटकोक असे या अस्वच्छ इंधनाचे नाव आहे.

तेल शुध्दीकरण प्रकल्पात कच्च्या तेलावर प्रक्रिया केल्यानंतर बॅरलच्या तळाशी उरणार्‍या डांबरासारख्या पदार्थाचा भारताला पुरवठा करण्यात येत आहे. हा पदार्थ स्वस्त व जाळल्यानंतर कोळशापेक्षा अधिक उष्णता निर्माण करत असल्याने याचीच जास्त खरेदी केली जात आहे.

हे इंधन वाहनातून वापरल्यानंतर हृदयाला धोकादायक असा कार्बनचे व सल्फरचे उत्सर्जन होत असते. यामुळे मानवाच्या हृदयाला व फुफ्फुसांना धोका निर्माण होत असतो.अशा इंधनाचा भारत हा मोठा आयतदार देश आहे. अमेरीकेने काही वर्षापुर्वीच स्वत:चे तेल उत्पादन प्रकल्प सुरू केले आहे.

पेटकोक प्रकारातील हा पदार्थ अमेरीका केवळ भारतालाच याचा पुरवठा करत आहे. याच इंधनावर भारतातील विविध कंपन्या व प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे.या कंपन्यामधून हवेत उर्त्सजीत होणारा धुर हा प्रदुषीत असतो. तो आकाशातील हवेत मिसळण्याऐवजी ता हवेच्या दाबामुळे परत जमीनीवर येत असतो.

अमेरीकेत याचा वापर पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे उत्पादन करणार्‍या कंपन्यांनी हे कोळशापेक्षा स्वस्त दरात भारताला विकत आहेत. यामुळे भारतात घातक असे प्रदूषण निर्माण होत आहे.

LEAVE A REPLY

*