कस्तुरबा विद्यालयाचे कलानाट्य राष्ट्रीय पातळीवर

0

चोपडा । राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान भारत सरकार व शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य, यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कला महोत्सव’ अंतर्गत दि. 27 रोजी कोथरूड (पुणे) येथे झालेल्या राज्यस्तरीय कलाउत्सव स्पर्धेत लोकनाट्य या कला प्रकारात चोपडा, (जि.जळगाव) येथील कस्तुरबा माध्यमिक विद्यालयाने प्रथम
क्रमांक मिळवून विद्यालयाच्या संघाची राष्ट्रीयस्तरावरील भोपाळ (मध्यप्रदेश)येथे होणार्‍या स्पर्धेसाठी निवड झाली आहे हा संघ राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमधील प्रतिभा ओळखून त्यांच्यातील कला गुणांना वाव देण्यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालय व राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान यांच्या मार्फत 2015-16 पासून कलाउत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. या कलाउत्सवात लोकसंगीत, लोकनृत्य, लोकनाट्य (अभिनय),दृश्यकला या कला प्रकारांचा समावेश करण्यात येतो जिल्हास्तरावरून निवड झालेला एक संघ विभागाचे प्रतिनिधित्व करतो विभागीय पातळीवरून , राज्य पातळीवर,तेथून राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत सहभागी होतात.

लोकनाट्य या प्रकारात विद्यालयाने सरकार द्या उत्तर हा विषयावर ग्रामीण भागातील विजेची समस्या,न्यायालयाकडून उशिराने मिळणारा न्याय,शेतकरी आत्महत्या, शहीद जवानाच्या पत्नीची होणारी फरफट,धर्माधर्मात होणारे वाद, हॉकी प्लेयर ची व्यथा,ह्या विषयांवर सरकार पुढे प्रश्न मांडून. द्या उत्तर असा सवाल करीत नाटिका सादर केली. यात सपना साळुंखे, प्रतीक्षा धनगर, स्मृती भोई, वर्षा कोळी, महेश पाटील,जयेश महाजन, प्रवीण पाटील, रोहित सूर्यवंशी, लोकेश चौधरी, ऋषिकेश पाटील या विद्यार्थ्यांनी या नाटिकेत विविध भूमिका सादर केल्यात. ह्या विजयी स्पर्धकांचे महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ सुरेश जी पाटील, कार्यकारी अध्यक्ष अ‍ॅड संदीप पाटील, सचिव डॉ स्मिता पाटील, शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, शिक्षणाधिकारी देविदास महाजन, उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर यांनी कौतुक केले आहे मुख्याध्यापक आर डी साठे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील शिक्षक एन आर पाटील,आर पी शाह , एस एल पाटील,एस व्ही पाटील,डी एस मिस्तरी,एम बी भोई,आदींनी प्रयत्न केले.

राष्ट्रीय पातळीवर जाण्यासाठी यांनी केले मार्गदर्शन – राज्यस्तरीय कलाउत्सव स्पर्धा कोथरूड (पुणे) येथे पार पडल्या यात कस्तुरबा माध्यमिक विद्यालयाने नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व करून राज्यातून प्रथम क्रमांक मिळविला संघास राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाचा राज्य प्रकल्प संचालक डॉ. सुवर्णा खरात, लावणी सम्राज्ञी मेघा घाडगे, लोकशाहीर नंदेश उमप यांनी कलानाट्याची प्रशंसा करून मार्गदर्शन केले.

विद्यालयात जल्लोष -विद्यालयाचा संघाने लोकनाट्य या कलाप्रकारात राज्यातून प्रथम क्रमांक मिळविल्याचे पत्र प्राप्त झाल्यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिवाळी साजरी केली. जल्लोष करीत शहरातून मिरवणूक काढून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.

LEAVE A REPLY

*