‘पटेल’च्या खेळाडूंचा सिंगापूर येथे गौरव

0

शिरपूर ।शिरपूर येथील आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलाचे म्हणजेच आदिवासी भागातील पाच खेळाडूंचे 21 कि.मी. अंतर धावणे मॅरेथॉन स्पर्धेसाठी सिंगापूर येथे आगमन झाले असून दि.1 डिसेंबर रोजी सकाळी पहिल्याच दिवशी भारताचे राजदूत (डेप्युटी हायकमिशनर) निनाद देशपांडे यांनी या सर्व खेळाडूंना विशेष वेळ देवून त्यांची बारकाईने विचारपूस केली व त्यांचा सन्मान केला. यामुळे शिरपूरच्या खेळाडूंसह भारताच्या क्रीडा क्षेत्राला मानाचा तुरा रोवला गेला आहे.

याबद्दल शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा माजी शिक्षण मंत्री आ.अमरिशभाई पटेल, संस्थेचे कार्याध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्यासह एस.व्ही.के.एम. संस्थेच्या स्पोर्टस्ड व्हायजरी कमिटीचे व्हाईस चेअरमन नवीन शेट्टी, डव्हायजरीक मिटीचे मॅनेजर प्रदिप संपत, संस्था उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, क्रीडा विभाग प्रमुख प्रितेश पटेल, सर्व संचालक, सर्व प्रशिक्षक, क्रीडाशिक्षक यांनी कौतुक केले आहे.

सर्व खेळाडू तसेच एस.व्ही.के.एम. संस्थेच्या स्पोर्टस्ड व्हायजरी कमिटीचे व्हाईस चेअरमन नवी नशेट्टी, व्हायजरी कमिटीचे मॅनेजर प्रदिप संपत, क्रीडा विभाग प्रमुख प्रितेश पटेल, क्रीडा शिक्षिका मनिषा पाटील हे सिंगापूर येथे दि. 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी रवाना झाले.

यातना रायण पावरा, सोमनाथ पावरा, जगन पावरा, चेतना पटेल, अश्विनी चौधरी व मुंबई एस.व्ही.के.एम. संस्थेचे मिहीर, शिवम त्यागी, श्रुतीसरण, सिमरन शर्मा या खेळाडूंनी यशस्वी गरुड झेप घेतल्याने त्यांना सिंगापूर येथे सन्मान प्राप्त झाला आहे.

शिरपूरच्या सर्व खेळाडूंचा शिरपूर येथील आर.सी.पटेल फार्मसी कॅम्पसच्या भव्य मैदानावर नियमितपणे सराव करुन घेण्यात आला. तसेच नियमितपणे सर्व खेळाडूंचा व्यायाम, आहार व सरावाचे धडे संस्थेतील सर्व क्रीडा शिक्षक, सर्व प्रशिक्षक व वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून देण्यात आले.

आर.सी.पटेल शैक्षणिक संकुल व एस.व्ही.के.एम. संस्था, मुंबई यांच्यावतीने माजी शिक्षणमंत्री, संस्थेचे अध्यक्ष आ.अमरिशभाई पटेल व संस्थेचेसह अध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या दूरदृष्टीसह अथक परीश्रमातून नेहमीच विद्यार्थी व खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नेहमीच प्रयत्न सुरु आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूंनी मजल मारुन शिरपूरचा नावलौकिक व्हावा या उदात्त हेतूने नेहमीच प्रयत्न सुरु आहेत.

LEAVE A REPLY

*