सीईओ दिवेगावकरांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार! – माधुरी अत्तरदे

0

जळगाव । जिल्हा परिषदेच्या बांधकाम कार्यकारी अभियंत्यास सदस्याच्या पतीने शिवीगाळ केल्याचा प्रकार काल दि.30 रोजी घडला होता.

याप्रकरणावरून सीईओंनी अपात्रतेच्या केलेल्या विधानाचा जि.प सदस्या माधुरी अत्तरदे यांनी खरपूस समाचार घेत सीईओ कौस्तुभ दिवेगावकर यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे पत्रकाद्वारे कळविले आहे.

जिल्हा परिषदेच्या सदस्या माधुरी अत्तरदे यांचे पती चंद्रशेखर अत्तरदे यांनी जिल्हा परिषदेच्या कामांच्या निवीदा रिकॉल झाल्याने बांधकाम विभागात येवून कार्यकारी अभियंता यांना अश्लिल शिवीगाळ केली होती.

याप्रकरणी सीईओ कौस्तुभ दिवेगावकर यांनी कार्यकारी अभियंत्यांने याबाबत तक्रार दिल्यास सदस्याच्या अपात्रेचा प्रस्ताव पाठविण्यात येईल असे सांगितले होते.

दरम्यान सीईओंच्या या वक्तव्यावरून माधुरी अत्तरदे यानी कायदेशीर सल्ला घेवून सीईओ कौस्तुभ दिवेगावकर यांच्याविरुध्द अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात येईल सेच पंचायतराज महिला समिती व महिला आयोगाकडे याबाबत तक्रार करण्यात येईल असे पत्रकाद्वारे कळविले आहे.

तसेच सीईओ दिवेगावकर यांनी अपात्रतेचा प्रस्ताव पाठवून दाखवावा असे आव्हान देखील माधुरी अत्तरदे यांनी सीईओ दिवेगावकर यांना दिले आहे.

राजकारणात न पडता सीईओंनी जबाबदारीने प्रशासक चालवावे
सीईओ कौस्तुभ दिवेगावकर यांनी प्रथम आयएएस आधिकारी म्हणून जबाबदारीने प्रशासक चालविण्याचे काम करावे त्यांनी राजकारणात पडून बालिशपणा करून नये.

त्यांनी या निवीदा रिकॉल झाल्याबाबत चौकशी करावी. पती चंद्रशेखर अत्तरदे यांनी माझ्या नावाचा कुठेही वापर केला नसल्याचे माधुरी अत्तरदे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

सीईओ दिवेगावकर यांच्या आरोप
माधुरी अत्तरदे यांना प्रसिध्द केलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, 50 वेळा जि.प.ला कामानिमित्त सीईओ यांना भेटण्यास गेले परंतू सीईओ भेटत नाही.

सीईओ नेहमी जिल्हा परिषदेऐवजी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व घरी कामकाज करतात. शालेय पोषण आहाराबाबत सर्वसाधारण सभेत अनेकवेळा तक्रारी होवून त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही.

तसेच तीन सर्वसाधारण सभा होवून ही इतिवृत्तातील चुका कमी होवू शकल्या नाहीत. सीईओंनी जिल्हा परिषदेतील चुकीची कामे थांबवून तसेच त्वरीत निर्णय घेण्यावर अधिक भर दावा व सदस्यांच्या राजकारणात बालिशपणा करून नये असे पत्रकाद्वारे कळविले आहे.

LEAVE A REPLY

*