Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव दिनविशेष फिचर्स मुख्य बातम्या विशेष लेख सेल्फी

….. आणि म्हणून महानोरांनी सीताफळाला नाव दिले ‘लताफळ’

Share
डिजीटल विशेष| पंकज पाटील : जळगाव। दि. 28 : भारताची गानसम्राज्ञी म्हणून ओळखल्या जाणार्‍या लता मंगेशकर उर्फ हेमा मंगेशकर आज आपला 90 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

गेली 75 वर्ष आपल्या मंजुळ व कोमल स्वरांनी भारतातीलच नव्हे तर विदेशातील रसीकजणावर मोहिनी लतादिदीनी घातली आहे.

…आणि सीताफळ झाले ‘लताफळ’

लता दिदींचा मंजुळ ,गोड व कोमल आवाजाचे करोडो चाहते आहेत. कववीर्य ना.धो. महानोरांनी लिहिलेली अनेक गाणी, कविता लता दिदींनी त्यांच्या आवाजात गायीली आहेत. ना.धो. महानोर म्हटले की रानातला कवी समोर येतो.

शेतकरी असलेल्या महानोरांच्या काव्य प्रतिभेला फुलविण्याचे काम या काळया मातीने आणि जीवन असलेल्या पाण्याने केले आहे. त्यामुळे महानोर या रानातल्या प्रतिभेत, कल्पनेत रमत असतात. पळासखेडा येथे शेती करतांना त्यांनी सीताफळाचे नवे संशोधीत वाण लावले. या सीताफळांना चांगली रसरशीत व साधारणत: अर्धा ते एक किलो वजनाची सीताफळे लागलीत.

या सीताफळांचा पहीला बहर येताच श्री. महानोर यांनी लता दिदींवरील प्रेमापोटी त्या फळाला ‘लता फळ’ हे नाव दिले. याच नावाने त्याची ते विक्रीही करत आहेत. सीताफळाला नुसते नाव देण्यावर श्री. महानोर थांबले नाहीत तर त्यांनी या लता फळांची एक पेटी स्वत: मुंबईला नेवून लता दिदींना भेट दिली. लता दिदींनीही मोठ्या उत्सुकतेने या लता ूळांची चव चाखली. गोड, मधुर लताफळाचा आस्वाद घेवून त्यांनी श्री. महानोर यांना धन्यवादही दिलेत.

महानोरांनी लिहिलेली अनेक गाणी लता दिदीनी सुुंदररित्या गायीली आहेत. एके काळी लता दिदीही वाकोदजवळील श्री. महानोरांच्या पळासखेड्याच्या रानातील काव्य महालास भेट दिलेली आहे.

लताफळ आणि महानोर

आजही जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील वाकोदजवळील पळासेखडा, सिल्लोड, औरगाबाद येथे गेल्यास तेथे लताफळाची विक्री होत असल्याचे दिसते. लता ूळ म्हटले की लता दिदी आणि लता दिदी म्हटल्या ही श्री. महानोर यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. लतादिदीनी दिर्घायुष्याच्या शुभेच्छा !

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!