राष्ट्रवादीच्या स्मरण शेतकरी दिंडीत जिल्हा पदाधिकारी सहभागी

0

जळगाव ।राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे यवतमाळ येथुन काढण्यात आलेल्या स्मरण शेतकरी दिंडीत जिल्हाध्यक्ष आ. डॉ. सतिश पाटील यांच्यासह पदाधिकारीही सहभागी झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आजपासुन दि. 11 डिसेंबर या कालावधीत स्मरण शेतकरी दिंडी यवतमाळ येथुन काढण्यात आली.

या दिंडीत माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार, प्रदेशाध्यक्ष आ. सुनिल तटकरे हे नेतृत्व करीत आहेत. या दिंडीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. डॉ. सतिश पाटील यांच्यासह जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, कार्याध्यक्षा मिनल पाटील,राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष ललित बागुल, नितीन तावडे, रमेश पाटील, अरविंद मानकरी, राजेंद्र शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारीही सहभागी झाले आहे. दि. 11 डिसेंबर रोजी ही दिंडी नागपुर येथे पोहोचणार आहे.

1980 च्या दिंडीचे स्मरण
आजपासुन सुरू झालेल्या स्मरण शेतकरी दिंडीत सन 1980 मध्ये खा. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली जळगावातुन काढण्यात आलेल्या शेतकरी दिंडीच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. खा. शरद पवारांचे विश्वासु स्व. मुरलीधरआण्णा पवार, स्व. प्रल्हादराव पाटील हे त्या दिंडीत सहभागी झाले होते. आज देखिल त्यांच्या वारसांनी या दिंडीत सहभागी होऊन पक्षकर्तव्य बजावले.

LEAVE A REPLY

*