फळे, भाजीपाला यार्डात सभापतींची अचानक पाहणी

0

जळगाव । कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती लक्ष्मण पाटील यांनी आज फळे, भाजीपाला यार्डात अचानक भेट देऊन पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी शेतकर्‍यांसह आडत्यांच्याही समस्या व अडचणी जाणून घेतल्या.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती लक्ष्मण पाटील यांनी आज सकाळी 6 वा. फळे,भाजीपाला यार्डात भेट देऊन पाहणी केली. आडते आणि व्यापारी हे खाजगी रजीष्टरमध्ये नोंद घेत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सभापती पाटील यांनी बाजार समितीकडुन देण्यात आलेल्या लिलाव रजीष्टरमध्येच नोंद करण्याच्या सुचना दिल्या.

तसेच त्यांनी शेतकर्‍यांशीही संवाद साधला. काळ्या आईची सेवा करणारा माझा शेतकरी शासनाच्या कुठल्याही अनुदानापासुन वंचित राहील असे घडता कामा नये अशा सुचनाही त्यांनी केल्या.

यासाठी शेतकर्‍यांनी हिशेबपट्टीचीच मागणी करावी व आडत्यांनीसुध्दा हिशेब पावती देणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.

समस्यांचीही पाहणी
मार्केट यार्डात पथदिवे बंद असुन, कचरा वाहतुकीची व्यवस्था नसल्याचे सभापतींच्या पाहणीत निदर्शनास आले. यासाठी स्वतंत्र टॅ्रक्टर लावण्याची व्यवस्था करण्याच्या सुचना त्यांनी केल्या. फळे व भाजीपाला मार्केट हे आगळे-वेगळे व्हावे अशी संकल्पनाही सभापती लक्ष्मण पाटील यांनी मांडली.

LEAVE A REPLY

*