तांबापुरच्या रुग्णासाठी डॉ.नीलेश चांडक ठरले ‘देवदूत’

0

जळगाव । शहरातील तांबापुरा परिसरातील एका तरुण रुग्णाच्या स्वादूपिंडावर रक्ताची गाठ असल्याने तो कोमात गेला होता. आर्थिक परिस्थितीमुळे मुंबई-पुण्याला जावून उपचार करु शकला नाही.

कॅन्सर तज्ञ डॉ.नीलेश चांडक यांची रुग्णाच्या नातेवाईकांनी भेट घेतल्यानंतर त्यांनी त्याला जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला.

त्यानंतर डॉ.नीलेश चांडक यांनी अवघड असलेली शस्त्रक्रिया सात तासात यशस्वी करुन रुग्णाला जिवदान दिले. त्यामुळे 35 वर्षीय रुग्णासाठी डॉ.नीलेश चांडक हे खर्‍या अर्थाने देवदूत ठरले.

तांबापुरातून रुग्णावर केलेली शस्त्रक्रिया यशस्वी ठरल्यामुळे रुग्णाला जगण्याची आशा पल्लवीत झाल्याची माहिती कॅन्सरतज्ञ तथा महाराष्ट्र कॅन्सर वॉरियर्स संघटनेचे जळगाव जिल्हा वॉरियर्स डॉ.नीलेश चांडक व जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.नागोराव चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी जिल्हा आरोग्यधिकारी डॉ.बबिता कमलापुरकर, डॉ.बी.आर.पाटील उपस्थित होते. पुढे बोलतांना डॉ.चांडक म्हणाले की, तांबापुरातील रहिवाशी नबी खान गनी खान वय-35 या रुग्णाच्या स्वादूपिंडावर रक्ताचीगाठ होती.

या रुग्णावर डॉ.नीलेश चांडक यांच्या रुग्णालयात उपचार सुरु असल्याने रक्ताच्या गाठीमुळे लिव्हर पूर्ण पूर्णपणे ब्लॉक झाले होते. त्यामुळे आतड्यांमधील टाकाऊपदार्थ संपूर्ण शरीरातून मेंदूपर्यंत पोहचल्याने रुग्ण अचानक बेशुद्ध होवून कोमात गेले.

दरम्यान रुग्णाच्या स्वादूपिंडावर असलेली रक्ताचीगाठ काढण्यासाठी रुग्णावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते परंतू ही शस्त्रक्रिया अत्यंत खर्चिक असल्याने तसेच रुग्णाची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने रुग्णाला डॉ.चांडक यांनी मुंबई येथील टाटा व के.एम.रुग्णालयात जावून शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता परंतू रुग्णाच्या नातेवाईकांचा डॉ.चांडक यांच्यावर संपूर्ण विश्वास टाकून त्यांच्याकडेच शस्त्रक्रिया करण्याचा आग्रह धरला.

यावर डॉ.चांडक यांनी रुग्णाला अतिरिक्त शल्यचिकीत्सक डॉ.किरण पाटील, डॉ.बिराजदार यांच्या मदतीने रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करुन शस्त्रक्रिया केली.

LEAVE A REPLY

*