एड्स निर्मूलनासाठी जनजागृती

0

जळगाव । जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे शहरात जनजागृती रॅलीद्वारे तसेच पथनाट्य आणि पोस्टर प्रदर्शनाद्वारे एड्स निर्मुलन आणि एड्स नियंत्रणाबाबत जनजागृती करण्यात आली. दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे आठवडाभर विविध जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

जागतिक एड्स दिनानिमीत्त जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यक्रमाच्या अध्यस्थानी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर होते.

तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. नागोराव चव्हाण, जिल्हा आरोग्यधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर, डॉ. विजय जयकर, नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्या गायकवाड, महेंद्र वळवी, उमेश वाणी उपस्थित होते. दरम्यान जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते एड्स बाबत जनजागृती करण्यासाठील लावण्यात आलेल्या पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

यानंतर रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. विविध फलकांच्या माध्यमातून तसेच पथनाटयातून जनजागृती करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी संजय पहूरकर यांनी केले. यशस्वीतेसाठी गिरीश गडे, शुभांगी पाटील, रुपाली पाटील, प्रतिभा चौधरी, मनिषा वानखेडे, सुवर्णा साळुंखे, प्रशांत पाटील, मिनल वाघोदेकर, जगदिश शिंदे, छाया मोरे, रजनी पाटील, डॉ. निलीमा चौरे, प्रमोद बोराखडे, डॉ. रेश्मा उपाध्ये, डॉ. अनुपमा जावळे यांच्यासह जिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

*