दादाजी धुनिवाले महाराजांची शोभायात्रा

0

जळगाव । श्री हरिहर नित्य सेवा मंडळ संचालित दादाजी दरबार खेडी येथे दादाजी धुनिवाले महाराज यांच्या 88 व्या उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. भजन संध्या, महाआरती यासह परिसरात शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेचे चौका चौकात स्वागत करण्यात आले.

दादाजी धुनिवाले महाराज यांच्या वार्षिक उत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रम खेडी येथील दादाजी दरबारात झाला. सकाळी 9 वाजता पोलनपेठ, सिटी बसस्टॅण्ड मागील श्री दादाजी सत्संग केंद्रातून श्री दादाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

सुशोभित केलेल्या रथावर श्री दादाजी महाराज यांची प्रतिमा विराजमान करण्यात आली होती. शोभायात्रेत मंगल कलशधारी महिला सहभागी झाल्या होत्या. शोभायात्रेत विविध भजनी मंडळे सहभागी झाली होती. शोभायात्रेच्या अग्रभागी ध्वजाधारी घोडेस्वार होता.

सकाळी काकडआरती, दुपारी महाप्रसाद, नर्मदा मातेची आरती, सायंकाळी महाआरती होवून रात्री भजन संध्या कार्यक्रम झाला. कार्यक्रमासाठी श्री दादाजी परिवारातील भक्तजनांनी परिश्रम घेवून कार्यक्रम उत्साहात पार पाडला.

LEAVE A REPLY

*