भोईटनगर रेल्वे गेटमध्ये बिघाड झाल्याने दोन तास वाहतूक ठप्प

0

जळगाव । शहरातील पिंप्राळा रस्त्यावरील भोईटेनगर रेल्वे गेटला सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास रिक्षाने धडक दिल्याने गेटमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे जवळपास दोन तास दोन्ही बाजुंची वाहतुक विस्कळीत झाली होती. रेल्वेच्या संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी धाव घेवून तात्काळ गेटच्या कामात दुरुस्ती केली.

याबाबत प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली माहिती अशी की, रेल्वे विभागाकडून स्वयंचलित रेल्वेगेट गेल्या काही दिवसांपासून बसविण्यात आले आहे.

यात पिंप्राळा रेल्वेगेट दर 10-15 दिवसांत वेगवेगळया कारणाने बंद काही वेळ बंद राहते. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होवून नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो.

आज सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास एका रिक्षा चालकाने गेटला धडक दिली. त्यामुळे गेट उघडण्याच्या यंत्रात बिघाड झाल्याने दोन तास गेट बंद पडले.

रेल्वे प्रशासनाचे कर्मचार्‍यांनी त्वरीत धाव घेवून झालेल्या बिघाड दुरुस्ती केला. मात्र दोन तास गेट बंद झाल्याने दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबलेली होती.

त्यामुळे मोटारसायकलस्वारांनी बजरंग बोगद्याचा पर्याय निवडला होता. परंतू या ठिकाणी देखील अचानक गर्दी वाढल्याने बर्‍याचवेळ मोटारसायकलस्वरांना थांबावे लागत होते.

LEAVE A REPLY

*