दहिगाव येथे ट्रॅक्टर ट्रॉलीखाली दबुन नऊ वर्षीय बालिकेचा मृत्यु

0

दहिगाव, ता.यावल । येथील आंबेडकर नगरातील मोहराळा रस्त्यावर उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीखाली 9 वर्षीय बालिका दाबली जावून मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना दि. 1 डिसेंबर 2017 रोजी सायंकाळी 6 वाजेदरम्यान घडली.

मोहराळा रस्त्यावरून दहिगाव येथून फैजपूर कारखान्यात पारोळा तालुक्यातील दगडी सबगव्हाण येथील राजेंद्र जुलाल पाटील हा ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली क्र.एमएच 18 एन 3399 चालवून नेत असतांना आंबेडकर नगरातील रहिवासी नंदिनी चंद्रकांत झाडवरे (वय 9) हिला ट्रॉलीचा धक्का लागल्याने ती टॅ्रक्टर ट्रॉलीच्या चाकाखाली दाबली गेली.

तिला अजय अडकमोलसह नातेवाईकांनी त्वरीत यावल ग्रामीण रूग्णालयात नेले असता तेथील वैद्यकिय अधिकारी दिनेश देवास यांनी मृत घोषित केले.

घटनेचे वृत्त समजताच पोलिस उपनिरिक्षक योगेश तांदळे, हेकॉ महेबुब तडवी, सिकंदर तडवी, राहुल चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला व आरोपीस ताब्यात घेतले.

मयत बालिका ही तिच्या आईच्या आईवडिलांकडे शिक्षण घेत होती. मयत बालिके पश्चात आई, वडिल, बहिणी असा परिवार आहे.

याघटनेबाबत गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी मसाका संचालक मिलिंद नेहेते,पोलिस पाटील संतोश पाटील, कृउबाचे सत्तार तडवी व देविदास पाटील आदींनी भेटी दिल्या.

LEAVE A REPLY

*