जिल्हाधिकारी यांची न.पा. रूग्णालय, सांस्कृतिक भवनासह पालिकेची पुन्हा झाडाझडती

0

भुसावळ । जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी दुसर्‍या दिवशीही सकाळी 9.30 वाजाता येथील नगरोालिकेत दाखल होऊन सफाई कर्मचार्‍यांची झाडाझडती सफाई कामगार व पालिका प्रशासनाला स्वच्छता व इतरबाबींबाबत सुचना केल्या. जिल्हाधिकारी यांच्या कडून सलग दुसर्‍या दिवशी झाडाझडती केल्याने कर्मचार्‍यांनी धसका घेतला आहे.

जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी दि. 1 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वजाता पालिकेत दाखल झाले. यावेळी मात्र शासकीय सुटी असुनही कर्मचारी पालिकेत हजर असल्याचे दिसून आले.

यावेळी सकाळी 10 वाजता पालिकेच्या सफाई कामगारांची भेट घेवून वार्तालाप केला. सफाई कामगार 20-20 हजार रुपये पगार घेवून काम न करणे चुकीचे काम कारणारे तसेच गैरहजर राहणार्‍या कर्मचार्‍यांवर बडतर्फ करण्याची कारवाई करण्याचा ईशारा दिला.

यानंतर कामगारांशी वार्तालाप करुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.यात कमगारांनी पालिकेत सफाई बाबतच्या साधनांची कमतरता असल्याचे सांगितल्यावर त्यांनी मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर यांना कर्मचार्‍यांना साधने तात्काळ उपलब्ध करुन देण्याबाबत सुचना केल्या तसेच. दि.15 डिसेंबर पर्यंत शहरातील विविध भागांमध्ये स्वच्छता मोहिम राबवून स्वच्छता करण्याच्या सुचना दिल्या.

यानंतर त्यांनी पालिका रुग्णालयात भेट देवून रुग्णालय व स्वच्छतेची पाहणी केली. इमारतीची दुरुस्ती व रंग रंगोटी करण्याबाबत सुचनाही देवीन रुग्णांच्या सुविधा व औषधींची सुविधा देण्याबाबतही सुचना दिल्या.दरम्यान पालिका परिसर स्वच्छ करण्यासाठी दि. 2 रोजी पालिकेकडून मोहिम हाती घेण्यात येणार अहे.

रुग्णालयातून त्यांनी आपला मोर्चा पालिका स्थलांतरीत होणार असलेल्या सांस्कृतिक भवनाकडे वळवत भवनाच्या इमारतीबाबात कालच नाराजी व्यक्त केली होती त्यानुसार इमारतीची रंगरंगोटी शासकीय कार्यालयांप्रमाणे करण्याची व इमारतीला मॉनिंग ग्लोरी कलर देण्याबाबत सुचना दिल्या.

नवीन इमारतीत जो पर्यंत सुविधा उपलब्ध होत नाही तो पर्यंत पालिका कार्यालय स्थलांतरीत करु नये. व लवकरात लवकर सुविधांची पूर्तता करण्याबाबतही सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर, उपगनराध्यक्ष युवराज लोणारी यांच्यासह पालिकेचे विविध विभागातील अभियंता कर्मचारी उपस्थित होते.

नगरपालीकेत 30 रोजी कामावर उशिरा येणारे कर्मचारी, दांडी बहाद्दुर कर्मचारी, हजेरी पुस्तकात अगावू स्वाक्षर्‍या करणारे सह्याजीराव आदी 25 कर्मचार्‍यावर कारवारई करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी
मुख्याधिकारी बी़टी़ बाविस्कर यांना दिल्या आहेत़ लवकरच योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी यांनी भुसावळ शहर व पालिकेकडेे आपले लक्ष आकर्षित केल्याने पालिका कर्मचार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांचा धसका घेतल्याचे चित्र आहे.जिल्हाधिकारी यांच्या या मोहिमेचे मात्र नागरिकांकडून स्वागत होत आहे.

LEAVE A REPLY

*