१० दिवसात पुन्हा गोलाणीत मीटर रुम जळाले

0
जळगाव |  प्रतिनिधी :  गेल्या आठवड्यात शनिवारी मीटर रुम जळाल्याने संपूर्ण गोलाणी मार्केट दीडदिवस अंधारात होते. महावितरणने तात्पुरती दुरुस्ती करुन विद्युतपुरवठा सुरळीत केला होता. मात्र पुन्हा मीटर रुमला आग लागल्याने गोलाणी मार्केट अंधारात आहे.

गोलाणी मार्केटमध्ये दि.१३ रोजी विद्युत पुरवठा करणार्‍या तीन मीटर रुम जळाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर गोलाणी मार्केटच्या स्वच्छता व सुरक्षितेचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता.

दरम्यान, मनपा स्वच्छता तर महावितरणने विद्युत पुरवठा करणार्‍या रुमांमधील मोकड्या वायरिंगला बदलवून नवीन वायरिंग टाकल्या होत्या. मात्र १० दिवसात पुन्हा मीटर रुम जळाल्याची घटना आज सायंकाळी ५.१५ वाजेच्या सुमारास घडली.

यामुळे संपूर्ण गोलाणी मार्केटचा विद्युतपुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडीत करण्यात आला होता. गोलाणी मार्केटमधील उघड्या विद्युत रुम तसेच स्वच्छतेबाबत आयुक्त जीवन सोनवणे यांना पुरुषोत्तम टावरी व रामजी सुर्यवंशी यांनी तक्रार दिली आहे.

तक्रारीची दखल अद्यापही घेतली गेली नसल्याचे ग्राहक व व्यापार्‍यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले.

LEAVE A REPLY

*