उज्ज्वल्स स्प्राऊटर इंटरनॅशनल स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन : बाल संशोधकांचे समाजोपयोगी मॉडेल्स्

0
जळगाव |  प्रतिनिधी :  उज्वल्स स्प्राऊटर इंटरनॅशनल स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे मॉडेल तया केले होते. या प्रदर्शनात इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या व्हाईट हाऊसच्या मॉडेला सर्वोत्कृष्ट मॉडले म्हणून पारितोषिक देण्यात आले.

विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन शाळेचे संस्थपाक अध्यक्षा अनघा गगडानी, डॉ. शीतल काबरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापिका मानसी भदादे, उपमुख्याध्यापिका साक्षी ओखदे, कामिनी धांडे उपस्थित होते.

प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी हॅड्रॉलीक अलार्म, समुद्राच्या पाण्याने वीज निर्मिती, मिनी हिटर, सोलर सिस्टिम, डोर ओपनिंग अलार्म, प्रधानमंत्री ग्रामसेवक योजना, सेंद्रिय शेती भविष्यात बिना मातीची शेती, सोलर एनर्जी, मंगळयान रिड्युस सॉईल पोल्युशन, इको कूलर, स्मार्ट सिटी, पाणी आडवा पाणी जिरवा, एकत्र न होणारे दोन घटक यासह विविध विज्ञानिक प्रयोगांचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांची विज्ञान वृत्ती वाढावी व त्यांच्या सृजनशीलतेला व्यासपीठ मिळावे या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे मत प्रदर्शन बघण्यासाठी आलेल्या पालकांनी व्यक्त केले. विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षण सरिता जैन, डॉ.राधिका सोमवंशी यांनी केले. यशस्वीतेसाठी सुनयना चोरडिया, नीलिमा चौधरी यांच्या सह शिक्षक व शिक्षकेतर इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

‘या’ मॉडेल्सना उत्कृष्ट पारितोषिक

विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात तयार केलेल्या विविश विषयाचा सहभाग व नाविन्यपूर्ण मॉडेल्स तयार करण्यात आले होते. यामध्ये इयत्ता नववीच्या व्हाईट हाउसला सर्वोत्कृष्ट पुरस्कार देण्यात आला. तर त्यानंतर ब्लू हाउस, ग्रीन हाउस तर सॅफरॉन हाउस हे प्रकल्प उत्कृष्ट ठरले.

हे आहेत विजेते विद्यार्थी

विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मॉडेल्स तयार केले होते. यामध्ये नर्सरी मधून प्रथम- पार्थ महाजन, द्वितीय- पारस महाजन, तृतीय- भावेश गाढे, ज्यू.के.जी. मधून प्रथम- हंसिका पाटील, द्वितीय- चंचल राजवानी, तर तृतीय- कनक हेमनानी सी.के.जी. मधून प्रथम- आयुष्य माळी, द्वितीय- साची आहुजा तर तृतीय- कुशल पाटील हे विद्यार्थी विजेते ठरले.

LEAVE A REPLY

*