‘माझे आरोग्य माझा अधिकार’

0
भुसावळ |  प्रतिनिधी :  एड्स ग्रस्तांना समाजात मिळणार्‍या हिन वागणूकीमुळे रुग्णाचे मानसिक खच्चीकरण होत असल्याने अनेक रुग्णांनी आपली जीवन यात्रा संपविल्याच्या घटना दरम्यानच्या काळात घडल्या आहे.
मात्र अशा रुग्णांबाबात समाजात असणारी कलंक व भेदभावाची भावना संपविणे (शुन्य) यासाठी रुग्णांची जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभागाच्या एआरटी सेंटरच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहे

.यासाठी जागतिक एड्स दिना निमित्त शासनस्तरावर ‘माझे आरोग्य माझा अधिकार’ हे घोषवाक्या या वर्षासाठी निश्‍चित करण्यात आले आहे. तसेच दि. १ ते १५ डिसेंबर दरम्यान विविध कार्यक्रम समुमदेशान कार्यक्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

रुग्णांबाबत समजात जागृती व तालुकास्तरावर रुग्णांना सल्ला व विविध चाचण्यांसाठी एप्रिल २०१५ पासून भुसावळ नपा रुग्णालयात एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र (एआरटी) सुरु करण्यात आले असून यातून अनेक रुग्णांचे समूपदेशन करण्यात येत आहे. संपूर्ण जिल्ह्यात ११ सेंटर सुरु आते.

जिल्ह्याभरातील केंद्रांमधून वर्षभरात ५५ हजार ५५५ जणांना समुपदेशन करण्यात आले. त्यापैकी ३हजार ३२१ जणांना बाधा झाली असून ७ जणांना एचआयव्हीची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

सन २००७ ते २०१७ दरम्यान तब्बल ७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांचा मृत्यू व लागण रोखण्यासाठी शासनातर्फे विशेष कार्यक्रम राबविण्यात आला असून ‘गेटींग झिरो’ साठी प्रयत्न होत अहे. या अंतर्गत एच.आय.व्ही. संसर्गीत व्यक्तींचे आर्युमान व रोग प्रतिकार शक्ती वाढविणारी औषधी सामान्या रुग्णालय व ए.आर.टी केंद्रातून विनामुल्य उपलब्ध करून देण्यात येत आहे.

या उपचारादरम्यान रुग्णाबाबत गोपनीयता ठेवण्यात येत असल्याने. या केंद्रातून उपचार घेण्यासाठी रुग्ण पुढाकर घेतांना दिसत आहे. या केंद्रातू त्यांच्यावर समोचार होत असल्याने रुग्ण समोर येण्यास धजावत नाही. यामुळे अधिकाधिक रुग्णांवर उपचार करणे शक्य होत आहे.

जानेवारी २००७ ते आक्टोबर २०१७ दरम्यान जवळपास ११ हजार १९१ रुग्णांची एआरटी सेंटर मध्ये नोंदणी करण्यात आली असून ८हजार ५१५ रुग्णांना औषधीचे वाटप करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र सुरु झाल्यापासून रुग्णांमध्ये होत असलेल्या समोपचाराने रुग्णांच्या संख्येत कमी होत आहे. गेल्या १० वर्षाचा आढावा घेतला असता २००७-०८ मधील एचआयव्ही बाधित गरोदर मातांची संख्या ११४ होती ती या वर्षी २० वर आली आहे. तर साधरण रुग्णांमध्ये २००७ मध्ये बाधितांची संख्या १३०९वरुन ३३३ वर आली आहे. गेल्या दहा वर्षात ही संख्या १२.६१ टक्केवरुन ०. ५५ वर आली आहे. असचा प्रयत्न सुुरु असल्याने आगमी वर्षांमध्ये ‘गेटींग झिरो’ शक्य आहे.

शहरात कामानिमित्त बाहेर पडलेल्या कमागारांवर व समलिंगी लैंगिक व्यक्ती व वैश्या व्यवसायातील महिलांना समूपदेशन करण्यासाठी शहरात गोदावरी मेेडिकल महाविद्यालय व हॉस्पिटल व राष्ट्रविकास संस्थेतर्फे काम करण्यात येत आहे.

याअंतर्गत संस्थेतर्फे दि. १२ रोजी भुसावळ येथील डिआयसीसी केंद्रात दुपारी २ वाजता भगिनी मेळावाव्याचे (देह विक्री करणार्‍यार महिलांसाठी) आयोजन तर दि. १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३०वाजता एमएसएम (पुरुष पुरुषांमधील समलैंगिक संबंध) मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*