ग.स.अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी इच्छुकांची फिल्डिंग

0
जळगाव |  प्रतिनिधी :  जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी अर्थात ग.स.सोसायटीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला असून दि.९ रोजी निवड करण्यात येणार आहे.

त्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी इच्छुकांकडून जोरदार फिल्डींग लावली जात आहे. यात ११ संचालक हे प्राथमिक शिक्षक असल्याने अध्यक्षपदासाठी विलास नेरकर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. तसेच दुसरीकडे सुभाष जाधव, उदय पाटील, सुनिल पाटील हे देखील अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहे.

ग.स.सोसायटीच्या भुसावळ येथील इमारतीच्या उद्घाटनानंतर अध्यक्ष तुकाराम बोरोले व उपाध्यक्ष महेश पाटील यांनी आपल्या पदाचा संचालकांच्या बैठकीत राजीनामा बी.बी.आबा पाटील यांच्याकडे सादर केला होता. त्यानंतर सर्व संचालकांचे राजीनामे मंजुर करून जिल्हा उपनिबंधकांकडे पाठविण्यात आले होते.

त्यानुसार आज उपनिबंधक यांनी नवीन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीबाबतचा कार्यक्रम जाहीर करून दि.९ रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने आज सर्व संचालकांना अजेंडा वितरीत करण्यात आला आहे. सहकार गटाच्या बी.बी.आबा पाटील यांची ग.स.सोसायटीवर एकहाती सत्ता आहे.

त्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडी बाबतचा अंतिम निर्णय बी.बी.पाटीलच घेणार आहे. यात ११ संंचालक प्राथमिक शिक्षक असल्याने अध्यक्षपदी प्राथमिक शिक्षक संचालकांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तसेच उपाध्यक्षपदासाठी महिला संचालकांना संधी दिली जावू शकते.

LEAVE A REPLY

*