जळगाव पीपल्स् बँकेला उत्कृष्ट संकेतस्थळ पुरस्कार जाहीर : दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते तीन रोजी पुरस्कार प्रदान सोहळा

0
जळगाव |  प्रतिनिधी :  दिव्यांगजणांसाठी सुलभ संकेतस्थळ निर्माण करण्यासाठी दिला जाणारा उत्कृष्ट संकेतस्थळ पुरस्कार जळगाव येथील ‘द जळगाव पिपल्स कॉ-ऑफ बँकेस’ जाहीर झाला आहे. दि.३ रोजी जागतिक अपंगदिनी दिल्लीतील विज्ञान भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांगजण सक्षमीकरण विभागाच्या वतीने दरवर्षी उल्लेखनिय कार्य करणार्‍या संस्थांना दिले जाते.

यावर्षी महाराष्ट्रातील दोन व्यक्ती आणि तीन संस्थांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यात दिव्यांगजणांसाठी सुलभ संकेतस्थळ निर्माण करण्यासाठी दिला जाणारा उत्कृष्ट संकेतस्थळ पुरस्कार जळगाव येथील ‘द जळगाव पिपल्स कॉ-ऑफ बँकेस’ जाहीर झाला आहे.

पुरस्काराचे वितरण दि.३ रोजी दिल्ली येथील विज्ञान भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत, केंद्रीय राज्यमंत्री ना.कृष्णपाल गुर्जर, ना.रामदास आठवले यांच्या उपस्थितीत होणार आहे.

पिपल्स बँकेने दिव्यांगाना हातळण्यास सुलभ असे संकेतस्थळ तयार केले आहे. यात कार्याची दखल घेत, पिपल्स बँकेची पुरस्कारासाठी निवड झाली असून बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील हे पुरस्कार स्वीकारणार आहे.

LEAVE A REPLY

*