एड्स जीवघेणा मात्र संसर्गजन्य नाही : प्रा.बी.एन. चौधरी

0
धरणगाव |  प्रतिनिधी :  एड्स हा जीवघेणा आजार असला तरी तो संसर्गजन्य नाही. एड्स झालेला असला तर घाबरुन न जाता योग्य काळजी घेतली तर दीर्घकाळ आनंदी जीवन जगता येते. एड्स रुग्णाला दूर लोटून त्याला वाळीत न टाकता त्यास योग्य औषधोपचार देण्याची, काळजी घेण्याची व त्याच्याशी मैत्री करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन प्रा. बी. एन.चौधरी यांनी केले.

पी. आर. हायस्कूलमध्ये जागतिक एड्स दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रा. चौधरी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत एड्स या आजाराची लक्षणे, तो कश्यामुळे पसरतो ते घटक आणि त्याची कशी काळजी घ्यावी या संदर्भात मार्गदर्शन केले.

समाजात एड्सबद्दल पसरलेले गैरसमजही त्यांनी आपल्या मनोगतातून दूर केले. आजार होवून त्याची काळजी घेण्यापेक्षा तो होवू नये म्हणून वेळीच काळजी घ्यावी असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जी. आर. सुर्यवंशी यांनी, सुत्रसंचलन एम. डी. परदेशी यांनी तर आभार प्रदर्शन एन. आर. सपकाळे यांनी केले. याच कार्यक्रमात गीता जयंती निमित्त हभप. दिनकर म्हस्के यांनी गीतेचे महत्त्व व उपयुक्तता यावर मुलांना मार्गदर्शन केले.

येथील ग्रामीण रुग्णालय व पी. आर. हायस्कूलच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिनानाच्या पूर्वसंध्येला जाणिव जागृती निर्मितीसाठी विद्यार्थ्यांची रॅली आयोजित केली होती. वैद्यकिय अधिकारी डॉ. गिरीष चौधरी यांनी रॅलिला झेंडी दाखवून रॅलिला सुरवात केली.

या प्रसंगी, मुख्याध्यापक एस.ई.मिसर, उपमुख्याध्यापक बी. एन. चौधरी, एन. सी. ऑफीसर डी. एस. पाटील, डॉ. संजीवकुमार सोनवणे, शरदकुमार बन्सी, आर. के. सपकाळे, बी. डी. शिरसाठ, के. आर. वाघ, यु. एस. बोरसे, एस. पी. सोनार, पी. व्ही. असोदेकर, एस. के. बेलदार, एस. बी. घुगे, डॉ. व्ही. बी. गालांवर, सौ. व्ही. आर. डहाळे, डॉ. तुषार जोगी, समुपदेशक डी. जी. शिंपी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आर. एन. काकडे, भाग्यश्री कांबळे, जयेश सोनवणे, एन.सी. पाटील, स्वेतांजली निंबाळकर, अंजली देवरे, महाले रामदास, प्रविण चव्हाण, अतुल पाटील, अरुण सोनवणे, योगिता डिमर, दिनेश पाटील, प्रदीप येवले आदी उपस्थित होते.

धरणगावातील प्रमुख रस्त्यावरुन रॅली निघून विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या. ग्रामीण रुग्णालयाच्यावतीने विद्यालयात एड्स तपासणी शिबिर घेण्यात आले.

LEAVE A REPLY

*