चोपडा येथे पद्मावती चित्रपटाच्या विरोधात भव्य मोर्चा : विद्यार्थीनींसह महिलांचा सहभाग

0
चोपडा | प्रतिनिधी :  संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावती चित्रपटात इतिहासाची मोडतोड करून चुकीच्या पद्धतीने बनविला असल्याने तमाम राजपूत समाज व हिंदू धर्मियांचा अपमान झाला असून भावना दुखावल्या गेल्या आहेत. म्हणून हा चित्रपट प्रदर्शित होवू नये, सरकारने त्यावर बंदी घालावी यासाठी भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्च्यात विद्यार्थीनी , महिलांसह पुरुषांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता.

शासकीय विश्रामगृहापासून मोर्चास सुरुवात झाली. मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक , बाबासाहेब आंबेडकर चौक , सराफ गल्ली ,चावडी चौक मार्गे तहसील कार्यालयात धडकला यात शालेय विद्यार्थीनी व महिला फेटा बांधून मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.चोपडा तालुक्यातील क्षत्रिय राणा राजपुत समाजाने मोर्च्यांचे आयोजन केले होते. मोर्च्याला अखिल भारतीय युवा गुर्जर महासभा ,अखिल भारतीय कोळी समाज,सनातन संघटना,हिंदू जनजागृती समिती,यासह सर्व हिंदू संघटनांचा सक्रिय सहभाग होता.

मचित्तोड गढ की महाराणी पद्मावती का अवमान नाही सहेगा हिंदुस्थान म अशा घोषणा देत हा मोर्चा तहसील कार्यालयात पोहचला.यावेळी नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर यांनी स्वीकारले.

याप्रसंगी आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे , नगरसेवक प्रकाश राजपूत,हिंदू जनजागृती संघटनेचे प्रशांत दिवेकर, शिप्रा जुवेकर आदींची भाषणे झाली.यात त्यांनी संजय लीला भन्साळी दिग्दर्शित चित्रपटात चित्तोडगधची आण बाण शान असलेल्या महाराणी पद्मावती यांची व्यक्तिरेखा मूळ इतिहासाला बगल देऊन आक्षेपार्ह चित्रणे व विधाने चित्रपटात घेतली गेल्याने महाराणी पद्मावती यांची प्रतिमा मालिन करण्याचा प्रयत्न केला गेला आहे म्हणून राजपूत समाजाच्या व हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत असा चित्रपट प्रदर्शित करण्यावर बंदी घालावी तसे न झाल्यास जन आंदोलन छेडले जाईल.असा इशारा यावेळी देण्यात आला.

मोर्चात आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे , नगरसेवक प्रकाश राजपूत,किशोर चौधरी,महेश उर्फ भैय्या पवार,राजाराम पाटील,माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील,पंचायत समिती सभापती आत्माराम म्हाळके,उपसभापती एम,व्ही. पाटील,पं.स.सदस्य भरत बाविस्कर,हिंदू जनजागृती समितीचे प्रशांत दिवेकर, क्षिप्रा दिवेकर ,शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील,अमृतराव सचदेव,भाजपाचे प्रदीप पाटील,कॉंग्रेसचे हिंमतसिह पाटील रमेश बंधू,माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ धर्मेंद्र पाटील,विरपाल राजपूत (विरवाडे) तसेच गणेशसिंग परदेशी(अडावद)जितेंद्र परदेशी,शामसिंग परदेशी,अशोक राजपूत दीपक सिसोदिया, रमेशसिंह राजपूत, महेंद्रसिंग राजपूत ,कुलदीप सिसोदिया, विकास राजपूत,नरेंद्र राजपूत, सुनील राजपूत, दिलीप राजपूत (चौगाव),सरपंच विकास राजपूत,अमृत महाजन,प्रभाकर महाजन निवृत्त खैरनार(देवगाव), कुसुम पाटील, सुनीता व्यास,सुनीता पाटील, साधना परदेशी(चोपडा),सरला राजपूत उज्जैन राजपूत,रंजना राजपूत,मंगला राजपूत,कोळीला राजपूत यांचेसह महिला प्रतिनिधी आदींसह शेकडोंच्या संख्येने उपस्थिती होती.

मोर्चा शांततेत पार पडला.शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील ,पोकॉ विश्वास बोरसे,मांडोळे आदी कर्मचार्‍यांनी चोख बँदोबस्त ठेवला.

LEAVE A REPLY

*