बिबट्याच्या बंदोबस्तासाठी स्वतंत्र यंत्रणेसाठी अधिवेशनात प्रश्न मांडणार – ना.गुलाबराव पाटील

0
चाळीसगाव |  प्रतिनिधी :  बिबट्या हल्ल्यात गेलेेले प्राण आपण वापस आनु शकत नाही, परंतू यापुढे तालुक्यात बिबटयाच्या हल्ल्यात प्राण जाणार नाही, यासाठी सवार्र्त्तपरी प्रयत्न करणार आहोत. तसेच तालुक्यात होत असलेल्या बिबट्याच्या हल्ल्याच्या बंदोबस्तासाठी यापुढे कायम स्वरुपाची स्वतंत्र यंत्रणा कशी उभी करता येईल, यासाठी हिवाळी आदिवेशन प्रश्‍न मांडणार असल्याचे सुतोवचन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे दिले.

तालुक्यातील वरखेडे परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या कुटूंबियाची भेेट घेण्यासाठ गुरुवार दि.३० रोजी सहकार राज्य मंत्री गुुलाबराव पाटील हे तालुक्यात आले होते. मयताच्या कुटूंबियाचेे सांत्वन केल्यानतंर दुपारी १२ वाजता. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शिवसेनेचे मा.आमदार आर.वो.पाटील, जिल्हाध्यक्ष गुलाब वाघ, उपजिल्हाप्रमुख उमेश गुंजाळ, उपवनसरंक्षक आदर्श कुमार रेड्डी, प्रातांधिकारी शरद पवार, तहसीलदार कैलास देवरे, जेष्ठनेते तुकाराम कोळी, ता.आ.रमेश चव्हाण, कृउबाचेे सभापती रविद्र पाटील, उपसभापती महेंद्र पाटील, ऍड.आर.एल.पाटील, काशीनाथ गायकवाड यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना गुलबराव पाटील म्हणाले की, बिबट्याच्या हल्ल्यात मयत झालेल्या कुटूंबियाची भेट घेतल्यानतंर ग्रामस्थांच्या अपेक्षा जाणुन घेतल्या. या ठिकाणची परिस्थिती खरच भयावह असून ग्रामस्थ घराच्या बाहेर निघायला घाबरत आहे. त्यामुळे शेतीची कामे खोळबंली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

बिबट्याच बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाच्या आधिकार्‍यांशी चर्चा करुन, अजुन आठ शार्पशुटरची नेमणूक करण्याबाबतच्या सूचना केल्या आहेत. तसेच २४ तास लाईन राहवी यासाठी महावितरणच्या आधिकार्‍यांना सूचना देखील करण्यात आल्या आहेत. तरी देखील ते एैकत नसतील तर मग शिवसेनेच्या स्टाईलने त्यांना समजवण्यात येणार आहे.

खाजगी शार्पशूटरची नेमणूक

बिबट्याच्या दहशतीमुळे वरखेडे परिसरात तसेच संपूर्ण तालुक्यात परिस्थिती गंभीर झाली आहे. बिबट्याचा बंदोबस्तासाठी आठ अतिरिक्त शार्पशूटरची नेमणूक करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच शासना वितिरिक्त खाजकी शार्पशूटरची देखील मदत घेण्यात येणार असल्याचे गुलराब पाटील यांनी सांगीतले.

बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिजर्‍याच्या बाजूलाच पिजर्‍या बकर्‍या ठेवण्यात येतात, परंतू आता ह्या बकर्‍या मोकल्या ठेवण्यात याव्यात अशा सूचना आपण वनविभागाला केल्या आहेत. जेणेकरुन बिबट्या त्याठिकाणी येईल व टिपला जाईल असे गुलाबराव पाटील यांनी सांगीतले.

घटना घडल्यानतंर आम्ही शुध्दीवर आलो

बिबट्याच्या पहिल्या हल्यात मानवी जीव गेल्यानतंर जर आशा पद्धतीची यंत्रणा राबविण्यात आली असती तर पाच जिव वाचले असते असा प्रश्‍न पत्रकारांनी उपस्थित केला असता. गुलाब पाटील यांनी वनविभागा व आम्ही घटना घडल्यानतंर शुध्दीवर आलो आहोत.

अगोदर आशा पद्धतीची यंत्रणा राबविण्यात आली असती तर खरच पाच जीव वाचले असते. यापुढे घटना घडल्यावर नाही तर कायम स्वरुपाची बिबट्याचा बंदोबस्तासाठी वेगळी यंत्रणा उभारण्यासाठी आधिवेशनात प्रश्‍न मांडणार असल्याचेयावेळी श्री पाटील म्हणाले.

मयताच्या कुटूंबांना शिवसेनेकडून आर्थिक मदत

बिबट्या हल्ल्यात ठार झालेल्याना शिवसेने उपजिल्हा प्रमुख उमेश गुंजाळ यांच्याकडून प्रत्येकी ११ हजारांची मदत करण्यात आली. हि मदत मंत्री गुलांबराव पाटील यांच्याहस्ते मतयाच्या कुटूंबियांना देण्यात आली आहे.

अफवा पसरविणार्‍यांविरोध्दात गुन्हां

प्रातांधिकारी शरद पवार यांनी बिबट्या संदर्भात सोशल मिडियावर खोट्या अफवा पसरविल्या जात आहेत. अशा अफवा पसरविणार्‍यांविरोध्दात यापुढे गुन्हे दाखल करण्यात येईल तसेच नागरिकांनी देखील अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*