जिल्ह्यातील 20 वाळू गटांचा 13 कोटीत लिलाव

0

जळगाव । जिल्ह्यातील 20 वाळु गटांच्या वाळु लिलावापोटी महसूल प्रशासनाला 13 कोटी 26 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यात धरणगाव तालुक्यातील दोनगाव खु। गटासाठी व्ही.के. एंटरप्राईजेसकडून सर्वात मोठी 3 कोटी 15 लाख 93 हजार 188 रुपयांची ई-बोली लावण्यात आली.

जिल्ह्यातील 20 वाळु गटांच्या लिलावाची प्रक्रिया आज पार पडली. प्रशासनाकडून ई-पध्दतीने निविदा मागविण्यात आल्या होत्या. आज या निविदा उघडण्यात आल्या. यात वीसही वाळु गटांची लिलाव प्रक्रिया यशस्वी ठरली असून महसूल प्रशासनाला 13 कोटी 26 लाख 53 हजार 341 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदा वाळु लिलावाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे जिल्हा खनिकर्म अधिकारी दीपक चव्हाण यांनी सांगितले.

लिलाव झालेले वाळु गट
नांदेड भाग 1 – कृष्णमूर्ती बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स 2 कोटी 10 लाख, टाकरखेडा – धनराज घुले 71 लाख 29 हजार 204, वैजनाथ – धनराज घुले 1 कोटी 90 लाख 10 हजार, दोनगाव खुर्द – व्ही.के. एंटरप्राईजेस 3 कोटी 15 लाख 93 हजार 188, बेलव्हाय 1 – 9 लाख 5 हजार 464, बेलव्हाय 2 – 4 लाख 35 हजार 12, बेलव्हाय 3 – 3 लाख 91 हजार 876, गोभी – 7 लाख 79 हजार 426, सुनसगाव – 9 लाख 3 हजार 424, भानखेडे – 7 लाख 67 हजार 968, जोगलखेडे – 8 लाख 29 हजार 976, पथराड – 3 लाख 30 हजार 622, शिरागड 1 – 3 लाख 95 हजार 622, शिरागड 2 – 3 लाख 27 हजार 862 या गटांचे ठेके राजेंद्र मोहनलाल जैन यांना देण्यात आले. पिंप्रीनांदू – सुनंदाई बिल्डर्स 28 लाख 58 हजार 383, कुरंगी – 1 कोटी 21 लाख 51, खापरखेडे प्र.ज. – भगवती बिल्डींग मटेरियल 1 कोटी 81 लाख, कोळंबा – चामुंडा सप्लायर्स 28 लाख 7 हजार, कुरवेल – ओम साई बिल्डींग मटेरियल 42 लाख 83 हजार, भऊर 2 – साई किर्ती बांधकाम मटेरियल 77 लाख 5 हजार 245 असे एकूण 13 कोटी 26 लाख 53 हजार 341 रुपयांचे महसूल उत्पन्न प्रशासनाला प्राप्त झाले.

LEAVE A REPLY

*