एकाच दरातील जीएसटी अशक्य

0

नवी दिल्ली । भारतात वस्तू आणि सेवांवरील जीएसटीचा एकच दर अशक्य आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी एचडी लीडरशिप संमेलनात म्हटले.

ज्या देशातील लोकांची क्रयशक्ती समान असेल त्याच देशात एकाच दरातील जीएसटी लागू केला जाऊ शकतो, असेही त्यांनी पुढे नमूद केले.

भारतातील लोक हे विविध स्तरात विभागलेले आहेत. त्यामुळे येथील जीएसटीमध्ये 28, 18, 12 आणि 5 टक्के असे स्लॅब करण्यात आले आहेत.

ज्या देशातील नागरिकांचा आर्थिक स्तर समान असेल त्याच देशात एकाच दरातील जीएसटी लागू करता येऊ शकतो, असेही जेटली म्हणाले.

हवाई चप्पल आणि मर्सिडीज कारला एकच दर देण्याची करप्रणाली आपल्याकडे नसल्याचेदेखील जेटली यांनी यावेळी स्पष्ट केले.

भारताला 10 टक्के ग्रोथ रेटवर पोहोचण्यासाठी 2003-2008 प्रमाणे बूम पीरियडची गरज आहे. ते आव्हानात्मक असेल. पण, जग कशाप्रकारे पुढे जात आहे, त्यावर हे अवलंबून आहे.

भारताने गेल्या तीन वर्षात 7-8 टक्के वृद्धी दर मिळवत चांगले प्रदर्शन केले. सरकारने कमी दरातील जीएसटी लागू केल्यास त्याचा अर्थकारणावर परिणाम होऊ शकतो.

LEAVE A REPLY

*