बंधपत्राची सक्ती न करण्याच्या मागणीसाठी वाळू वाहतुकदारांचे साखळी उपोषण

0
जळगाव |  प्रतिनिधी :  जिल्ह्यातील वाळू वाहतुकदारांवर वाहन जप्ती, दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. परंतू त्यांच्या वाहन मुक्ततेसाठी वाळू वाहतुकदारांकडून मुद्रांकावर बंधपत्राची बेकायदेशीर सक्ती करु नये यासह अनेक मागण्यांसाठी वाळू वाहतूकदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील बिल्डींग मटेरियल स्पायर्स संलग्नीत वाळू वाहतुकदार संघटनेकडून आज पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे.

यामध्ये ज्या वाळू वाहतूकदारांकडे वाळू वाहतुकीचा परवाना व पावती आहे. त्यांच्या कडून अवैध वाळू वाहतुकच्या आरोपाखाली दंडात्मक व वाहन जप्तीची कारवाई करु नये, अवैध वाळू वाहतुक संदर्भात दिर्घकालीन उपाययोजना होण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या विशेषाधिकारात समन्वय समितीची नेमणूक करुन यामध्ये महसूल, पोलिस, परिवहन अधिकारी यांच्यासह वाळू ठेकेदार व वाळू वाहतूकदारांचा समावेश करुन त्यांची समिती स्थापन करावी\

तसेच अवैध वाळू वाहतुकींच्या तक्रारींचा यामध्ये तोडगा काढण्यात यावा, वाळू वाहतूकदारांच्या लाभाचे व हिताचे रक्षण व्हावे तसेच अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनास आवश्यक ते सहकार्य करुन वाळू वाहतूकदार करीत आहे, तशी हमी देखील देत आहे.

त्याचप्रमाणे वाळू वाहतूकदारांच्या जप्त वाहनांना बंधपत्राशिवाय सोडण्यात यावे, तसेच वाहन जप्ती करीत असतांना पंचनामा, जाब जबाब, नोटीस, खुलासा, कारवाई, न्याय, निर्णय या नुसार त्यांच्यावर कारवाई व्हावी या मागण्यांसाठी उपोषण केले जात आहे.

उपोषणात सुनिल नन्नवरे, सुधाकर नेवरे, चेतन शर्मा, विठ्ठल पाटील, संजय ढेकळे, अमित बच्छाव, दगडू सपकाळे, सुपडू सोनवणे, रविंद्र सपकाळे, राजेंद्र गोसावी, अनिल सपकाळे, नकूल ढाके, रहिम काझी, बाबू पटेल, फिरोज पठाण, भिका नन्नवरे, निखील पाटील, सुरज सोनवणे, सुकदेव सपकाळे, लीमण पाटील, जगदीश सोनवणे, सागर चौधरी, मनिष कोल्हे, विकास पाटील, विकी सोनवणे, भिकन इकबाल, कपील सानेवणे, नंदु हटकर, किरण हटकर, शैलेश ठाकरे, देविदास ढेकडे, प्रकाश झोपे, किरण चौधरी, याकुब खान, गणी मुसा, भिमराव मराठे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*