जि.प.सदस्याच्या पतीकडून बांधकाम अभियंत्यास शिवीगाळ

0

जळगाव । जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांकडून कामांचे निवीदा न मिळाल्याने जि.प. सदस्याच्या पतीने बांधकाम विभागात येवून कार्यकारी अभियंत्यास अश्लिल शिवीगाळ करून चांगलाच गोंधळ घातल्याचा प्रकार दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास घडला. दरम्यान बांधकाम विभागात पैसे घेवून टेंडर दिले जात असल्याचा आरोप सदस्याच्या पतीने केला.

याबाबत प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील साळवा-नांदेड गटातून माधुरी चंद्रशेखर अत्तरदे निवडून आल्या आहेत.

गेल्या 9 महिन्यात विकासाची एकही कामे होत नसल्याने सर्वच सदस्यांमध्ये नाराजी आहे. दरम्यान धरणगाव तालुक्यातील 8 कामांच्या निवीदा प्रसिध्द करण्यात आल्या होत्या.

यापैकी 6 कामे दुसर्‍या ठेकेदारांना दिली गेली. यावेळी जि.प. सदस्याचे पती चंद्रशेखर अत्तरदे यांनी निविदा दुसर्‍या ठेकेदारांना दिल्याने कार्यकारी अभियंत्यांविषयी नाराजी व्यक्त केली होती.

यावेळी बांधकाम कार्यकारी अभियंता प्रदीप कापडणीस यांनी उर्वरित दोन्ही निवीदा तुम्हालाच दिल्या जातील असे आश्वासन दिले होते.

परंतू दोन्ही कामांच्या फेरनिविदा झाल्याने ठेकेदारांनी सदस्यांचे पती चंद्रशेखर अत्तरदे यांना कळविले. चंद्रशेखर अत्तरदे यांनी बांधकाम विभागात येवून कार्यकारी अभियंता प्रदीप कापडणीस व कर्मचारी सी.एस.पाटील यांना अश्लिल शिवीगाळ करून पैसे घेवून निवीदा दिल्या जात असल्याचा आरोप केला. या प्रकारामुळे बांधकाम विभागात चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता.

LEAVE A REPLY

*