म्हसावद येथे एकाच रात्री दोन घरे फोडली

0

जळगाव । दि.30 । प्रतिनिधी-तालुक्यातील म्हसावद येथे एकाच रात्री दोन बंद टारगेट करुन चोरट्यांनी 47 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

म्हसावद बसस्टॅण्ड जवळ मधुकर आनंदा चिंचोरे व देविदास त्र्यंबक चिंचोरे यांचे घर आहे. देविदास चिंचोरे हे शेती कामानिमित्त जामनेर येथे काही दिवसांपासून वास्तव्यास आहे.

तर मधुकर चिंचोरे हे धुळे येथे नातेवाईकांकडे गेले होते. दोन्ही घर बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी कटरच्या साह्याने कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला.

आज सकाळी हा प्रकार गावातील काही लोकांच्या लक्षात आला. त्यांनी देविदास चिंचोरे यांना घटनेची माहिती दिली. मधुकर चिंचोरे यांच्या घरातून 7 हजार 500 रूपयांचे 03 ग्रॅम वजनाचे कानातील टॉप्स, 15 हजार रूपये किंमतीचे कानातील टॉप्स, 8 हजार रूपये रोख असा तर देविदास चिंचोरे यांच्या घरातून 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे टोंगल किंमत 12 हजार 500 रूपये तसेच 5 हजार रूपये रोख असा एकुण दोन्ही घरातून 47 हजाराचा ऐवज चोरट्यांनी लांबवून नेला. घटनेची माहिती कळताच एमआयडीसी औट पो.स्टे.च्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*