शहरातील 814 मिळकती जप्त

0

जळगाव । घरीपट्टी, पाणीपट्टीची गेल्या काही वर्षांपासून अनेकांकडे थकबाकी आहे. त्यामुळे प्रशासनाने बड्या थकबाकीदारांची यादी तयार करुन जप्तीची मोहिम सुरु केली आहे.

20 दिवसात प्रशासनाने 814 मिळकती जप्त केल्या आहेत. दरम्यान येत्या सात दिवसात जागेवरच लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांनी दिली.

महानगरपालिकेची आर्थिकस्थिती बिकट असतांनाही मालमत्ताकराची वसुली होत नसल्याची ओरड नेहमीच केली जाते. त्यामुळे प्रशासनाकडून संबंधित थकबाकीदारांना नोटीस बजावण्यात आल्या.

तरीही देखील थकबाकीची वसुली होत नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी विभाग प्रमुखांसह 200 कर्मचार्‍यांचे पथक नियुक्त करुन जप्तीची मोहिम सुरु करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार प्रभागनिहाय बड्या थकबाकीदारांची यादी तयार करुन जप्तीच्या कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे. आर्थिक वर्षात 71 कोटी 22 लाख 93 हजार मालमत्ताकराची मागणी आहे.

यात 28 कोटी 15 लाख 38 हजार 123 रुपयाची थकबाकी आहे. आणि चालू मागणी 43 कोटी 75 लाख 4 हजार 892 रुपये इतकी आहे. आतापर्यंत 24 कोटी 14 लाख 905 रुपयाची वसुली करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*