जपानच्या तज्ञांनी केली महापौरांशी चर्चा

0

जळगाव । जळगाव शहरात अमृत अभियानांतर्गत पाणीपुरवठा आणि भूमिगत गटारी व मल:निसारण योजना राबविण्यात येणार आहेे. त्या पार्श्वभूमीवर पाहणी आणि मार्गदर्शनासाठी जपानचे चार तज्ञ जळगावात आले आहेत.

सायंकाळी त्यांनी महानगरपालिकेत येवून महापौर ललित कोल्हे यांची भेट घेवून चर्चा केली. यावेळी महापौरांनी शाल व सन्मानचिन्ह देवून सन्मान केला.

जपान येथील ‘द जपान कौन्सिल ऑफ लोकल थॉरिटीज फॉर इंटरनॅशनल रिलेशन सिंगापूर या कंपनी’चे तज्ञ यामतानी किमीओ, सीयू मिन यांग, कावासाकी अकितो, अकिहिरो तेरानिशी हे जळगावात आले आहेत.

अमृत अभियानांतर्गत पाणीपुरवठा योजना आणि भूमीगत गटार व मल:निसारण योजना राबविण्यात येणार असल्याने तज्ञ पथकांनी वाघुर धरण, जलशुद्धकरण केंद्रासह शहरातील पाहणी करुन मार्गदर्शन केलेे.

सायंकाळी महापालिकेत येवून महापौर ललित कोल्हे यांची भेट घेतली. यावेळी महापौरांनी त्यांचे स्वागत केले. जलशुद्धीकरणासाठी अद्ययावत तंत्रज्ञान वापरण्याबाबत तज्ञांनी सूचना केली.

यावेळी उपमहापौर गणेश सोनवणे, सुनिल महाजन, शहर अभियंता बी.डी.दाभाडे, प्रकल्प अभियंता योगेश बोरोले, जैन उद्योग समूहाचे प्रतिनिधी श्री.चौधरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*