…तर अंगावरुन टॅक्टर चालवा !

0

जळगाव । महानगरपालिकेकडून नो हॉकर्सझोन क्षेत्रात अतिक्रमण निर्मुलन कारवाईची मोहिम सुरु आहे. सकाळी 11.30 वाजता इंडो अमेरिकन हॉस्पिटलजवळ काही हॉकर्सधारकांनी अक्षरश: टॅक्टर खाली झोपून अंगावरुन टॅक्टर चालवा असा पवित्रा घेतला. त्यामुळे काही वेळ वाद होवून तणाव निर्माण झाला होता.

महानगरपालिकेची अतिक्रमण निर्मुलन कारवाईची मोहिम गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. इंडो अमेरिकन हॉस्पिटलसमोर सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास महानगरपालिकेचे पथक कारवाईसाठी गेले होते.

नो हॉकर्स झोन क्षेत्रात लावण्यात आलेली हातगाडी पथकाने जप्त केली. परंतु हॉकर्सने कारवाईला विरोध केला. त्यामुळे शाब्दीक चकमक होवून तणाव निर्माण झाला होता.

दरम्यान एका विक्रेत्याने मनपाच्या वाहनाखाली झोपून अंगावर टॅक्टर चालवा! असा तिव्र संताप केला. त्यामुळे काहीवेळ वाद होवून तणाव निर्माण झाला होता.

कारवाई दरम्यान दुखापत झाल्याचा आरोप हॉकर्स संघटनेने केले. वाद वाढत असल्याचे लक्षात घेवून अखेर जप्त केलेली हातगाडी सोडून देण्यात आली.

LEAVE A REPLY

*