एचआयव्ही संसर्गित व्यक्ती शासकीय योजनांपासून वंचित

0

जळगाव । एचआयव्ही संसर्गित व्यक्ती शासनाच्या विविध सामाजिक कल्याणकारी योजनांपासून वंचित असल्याने विहान काळजी, आधार संस्थेच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती समुपदेशक वंदना पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हयात जवळपास 10 ते 12 हजार एचआयव्ही संसर्गित व्यक्ती असून यात दिड हजार बालकांचा समावेश आहे. शासनाच्या विविध सामाजिक कल्याणकारी योजना संजयगांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना इत्यादीचा लाभ मिळण्याकरीता वार्षिक उत्पन्नाचा निकष वार्षिक 21 हजार आहे. आजही हे निकष कायम आहे.

त्यामुळे एचआयव्ही सारख्या दुर्धर आजारापासून व्यक्ती शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित आहे. शासनाने वार्षिक 21 हजारांच्या उत्पन्नाचा निकषात बदल करावा अन्यथा वार्षिक उत्पन्न निकष मर्यादा वाढविण्यात यावी, जेणेकरून दुर्धर आजार असलेल्या गरीब गरजू व निराधार व्यक्तींना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणे सोयीस्कर होईल यासाठी विहान काळजी, आधार संस्थेच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.

पत्रकार परिषदेवेळी विहान संस्थेचे एन.व्ही.चौधरी, कल्पना जैन, सुनिता तायडे, साधना बडगुजर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*