‘स्मार्ट जळगाव ऍप’, कॉल सेंटरवर तीन दिवसात १५८ तक्रारी : आरोग्य विभागाच्या ८९ तक्रारी

0
जळगाव | प्रतिनिधी :  महानगरपालिकेने ‘स्मार्ट जळगाव ऍप’ व कॉलसेंटरची सेवा कार्यान्वित केली आहे. या तीन दिवसात १५८ तक्रारी प्राप्त झाल्या असून यात सर्वाधिक ८९ तक्रारी आरोग्य विभागाच्या प्राप्त झाल्या आहेत.

महानगरपालिकेच्या कामकाजासंबंधीत माहिती देण्यासाठी आणि तक्रारींचे तात्काळ निवारण व्हावे, यासाठी ‘स्मार्ट जळगाव ऍप’, कॉल सेंटर सुरु करण्यात आले आहे.

त्यासाठी ७९०००५१००० हा युनिक क्रमांक देण्यात आलेला आहे. सकाळी ७ वाजेपासून ते ११ वाजेपर्यंत कॉल सेंटरला तक्रारी नोंदविता येणार आहे.

या तीन दिवसात या दोन्ही प्रणालीला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. तीन दिवसात १५८ तक्रारी प्राप्त झाले आहे. यात पाणीपुरवठा २२, आरोग्य ८९, बांधकाम २०, लाइट १६, अतिक्रमर ५, नगररचना ३, मलेरिया विभाग १ व पर्यावरण विभागाच्या २ तक्रारींचा समावेश आहे.

तर तिन दिवसात स्मार्ट जळगाव हे अप ४९८ जणांनी डाऊनलोड केले आहे. जून महिन्यांपासून विभागनिहाय तक्रारींचा मासिक तक्ता तयार केला जाणार आहे.

सर्वाधिक तक्रारींचे निराकरण करणार्‍या पहिल्या तीन विभागांना दरमहा पारितोषिक तर सर्वात कमी तक्ररींचे निराकरण करणार्‍या शेवटच्या तीन विभागांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*