कब्रस्थानजवळील नाल्याजवळ आढळले नवजात बालकाचे शीर

0

जळगाव । शहरातील नेरीनाका कब्रस्थानाजवळील नाल्याजवळ नजवात बालकाचे शीर(डोक) आढळून आल्याची घटना आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती कळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

याबाबत प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेली माहिती अशी की, कासमवाडीच्या मागील बाजुस असलेल्या कब्रस्थानाजवळील नाल्याकाठी कुत्रा नवजात बालकाच्या शिराचे लचके तोडत असतांना परिसरातील नागरिकांना दिसून आले.

त्यांनी त्या कुत्र्याला हटकले असता, कुत्रा ते शीर सोडून निघून गेला. हा प्रकार परिसरातील नागरिकांना लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ याबाबत एमआयडीसी पोलिसांना कळविले.

घटनेची माहिती कळताच एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळानंतर पुन्हा त्याठिकाणी दोन-तीन कुत्र्यांनी येवून शीर पुन्हा उचलून नेले.

दरम्यान नवजात बालकाचे शीर नेमके कोठून आले याबाबत पोलिसांनी शोध घेतला. मागील एक महिन्यापूर्वी देखील याच परिसरात एका नवजात अर्भक आढळून आले होते. या परिसरात दफनभुमी व कब्रस्थानजवळ असल्याने नेहमी अशा घटना घडत असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*