मनपाच्या नाईट शेल्टरच्या दुरुस्तीसाठी मिळणार २२ लाखाचे अनुदान

0
जळगाव |  प्रतिनिधी :  महानगरपालिकेच्या भज्जीगल्लीतील धुळखात पडलेले नाईट शेल्टरच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून २२ लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. त्यानतंर महापालिका प्रशासन नाईट शेल्टर ना नफा ना तोटा तत्वावर स्वयंसेवी संस्थेला चालविण्यास देण्याचा निर्णय घेतला आहे.

नवीन बसस्थानकाजवळ भजे गल्लीत महापालिकेने सन २००९ मध्ये राष्ट्रसंत श्री गाडगेमहाराज यात्री ही नाइट शेल्टरसाठी इमारत बांधली आहे. मात्र, व्यवस्थापन न ठेवल्याने ही इमारतही धूळ खात पडली आहे. रात्रीसाठी यात्रेकरूंना निवारा म्हणून बांधलेली ही इमारत दिवसभर मात्र बंद असते.

ज्या प्रवाशांच्या सोयीच्या उद्देशाने हे निवासस्थान उभारण्यात आले आहे, त्या प्रवाशांना मात्र निवार्‍याअभावी कडाक्याच्या थंडीत बसस्थानक किंवा रस्त्यावर रात्र काढावी लागत आहे.काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे याबाबत निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर याठिकाणची साफसफाई करण्यात आली होती.

दरम्यान प्रभारी अप्पर आयुक्त राजेश कानडे यांनी या नाईट शेल्टरची पाहणी केली होती. यावेळी या ठिकाणी काही हॉकर्स त्याचा वापर करीत असल्याचे दिसले. त्यानतंर त्यांनी अतिक्रमणधारकांना काढले. नाईट शेल्टरच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे २२ लाख रुपयांच्या अनुदानाचा प्रस्ताव पाठविला आहे. ही रक्कम लवकरच मिळणार आहे.

महापालिकेने आता नाईट शेल्टर कार्यान्वीत करण्याचा निर्णय घेतला आहे. नाईट शेल्टर मनपा कर्मचार्‍यांकडून चालविणे जाणार नाही याची कल्पना असल्याने मनपाने आता यासाठी स्वंयसेवी संस्थेची मदत घेण्याचे ठरविले आहे.

ना नफा ना तोटा या तत्वावर हे यात्री निवासस्थान चालवू इच्छिणार्‍या संस्थांना ते चालवण्यास देण्यात येणार असल्याची माहीती अप्पर आयुक्त राजेश कानडे यांनी दिली आहे. याबाबत प्रक्रीया देखील सुरु करण्यात आली असल्याचे त्यानी सांगीतले आहे. त्यानंतर लवकरच भज्जगल्ली परिसरातील अतिक्रमण देखील काढण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*