रोटरी मिल्कसिटीचे ई-लर्निंग कार्य प्रेरणादायी-डॉ.के.एस.राजन

0
चाळीसगाव | प्रतिनिधी :  शिक्षण क्षेत्रात रोटरी क्लब ऑफ मिल्कसिटीचे कार्य समाजाला नवचैतन्याच्या प्रवाहात आणण्यासारखे चालू आहे. या ई-लर्निंगच्या माध्यमातून आधुनिक शिक्षणाचे ज्ञाने बालवयापासून शिक्षणाच्या माध्यमातून मिळाल्याने भावी काळ विद्यार्थ्यांसह भारताचा उज्ज्वल घडणार आहे. म्हणून रोटरी मिल्कसिटी ने हाती घेतलेले कार्य खरोखर समाजाला प्रेरणा देणारे असल्याचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर डॉ. के. एस. राजन यांनी ई-लर्निंग वाटप प्रसंगी विचार व्यक्त केलेत.

नुकतेच रोटरी क्लब ऑफ मिल्कसिटीच्या ऑफीसियल व्हीजीटच्या निमित्ताने डॉ. के. एस. राजन यांनी रोटरी क्लब ऑफ मिल्कसिटीला भेट दिली.

यावेळी व्यासपीठावर क्लबचे अध्यक्ष डॉ. संतोष मालपुरे, डी. जी. डॉ. के. एस. राजन, ए. जी. मनिष शहा, सचिव सुनिता जाधव, आधार महाले, दिपक पाटील उपस्थित होते. श्री.राजन पुढे म्हणाले की, रोटरी क्लबच्या माध्यमातून पोलीओ मुक्त भारत करण्यात यश आले.

याचप्रमाणे संपूर्ण देश ई-साक्षर करण्याचा संकल्प केलेला आहे. या संकल्पाच्या भागातील एक महत्वाचे कार्य आज चाळीसगावात पहावयाच मिळत आहे. हे अभिमानास्पद अशी बाब आहे. क्लबचे अध्यक्ष डॉ.संतोष मालपुरे यांचे याबाबतीतील योगदान अनन्य साधारण महत्वाचे आहे.

अध्यक्ष डॉ. संतोष मालपुरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी क्लबच्या वर्षभराच्या कार्याचा आढावा विशद केला. तसेच आगामी काळात करावयाच्या कार्याची माहिती दिली. डॉ. राजन यांचा परिचय मनीष शहा यांनी करुन दिला.

कार्यक्रमास तालुक्यातील पाच शाळांना ई-लर्निंग संचाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास रामभाऊ शिरुडे, लालचंद बजाज, ऍड. ओमप्रकाश शर्मा, चंद्रकांत ठोंबरे, सुभाष करवा, निलेश गुप्ता, आनन शिंपी, प्राचार्य जी. पी. वाणी, राजेंद्र छाजेड, प्रकाश कुलकर्णी, गणेश निकुंभ, विमलताई चौधरी, निगार चव्हाण, गितांजली देशमुख, मेघा बक्षी यांच्यासह रोटरी सदस्य व शिक्षक, मुख्याध्यापक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिपक पाटील व मेघा बक्षी यांनी केले तर आभार सुनिता जाधव यांनी मानले.

LEAVE A REPLY

*